Dr. Moti-Garda River Conservation Project's well-wisher at Maruti Temple. Ravindra Kumar Single. esakal
नाशिक

Nashik News : मोती नदीचे पाणलोट विकसित होणार : डॉ. सिंघल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कुसमाडी वनतळ्याची दुरुस्ती व गाळ काढण्याच्या कामाने मोती नदीच्या संवर्धनाचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे.

नदीच्या संपूर्ण पाणलोटात लोकसहभागातून नदी स्वच्छता व जलसंवर्धनाचे उद्दिष्ट असून त्याने संपूर्ण परिसरात आर्थिक व सामाजिक बदल घडण्याची ही नांदी ठरेल, असे मत राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी व्यक्त केले. (dr ravindrakumar Singhal statement Watershed of Moti River will developed Nashik News)

मोती - गारदा नदी संवर्धन प्रकल्पातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कुसमाडी येथे वनतळ्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. गंगागिरी प्रकल्प, रेन्बो फाउंडेशन, मराठमोळं इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, सृष्टी सोल्यूशन्स अशा विविध संस्थांच्या प्रयत्नातून मोती - गारदा नदी संवर्धन प्रकल्प आकारास येत आहे.

या प्रकल्पाच्या निमित्ताने शाश्वत पद्धतीने पाण्याच्या संवर्धनाची कामे हाती घेण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून ४५ हजार वर्गमीटर क्षेत्रफळ असलेल्या कुसमाडी वनतळ्याच्या गाळ काढण्याच्या तसेच, गळती दुरुस्तीच्या कामाचा प्रारंभ आज करण्यात आला.

या प्रसंगी नमामी गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, मराठमोळं इनोव्हेशन्सचे उमश ससाणे, परमानंद स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या संचालक भक्ती कोठावळे, क्रीडा संघटन नितीन हिंगमिरे, गंगागिरी प्रकल्पाचे संस्थापक मनोज साठे,

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

येवल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उन्हाळ्यात मोती गारदा संवर्धन प्रकल्पातर्फे कुसमाडीसह नायगव्हाण, हडप सावरगाव, धामोडे, नांदूर या पाच गावात जलसंवर्धनाची व वृक्षारोपणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. भारतीय जैन संघटनेने मोफत पोकलेन यंत्र उपलब्ध करून दिले आहे.

नदीच्या परिसरासाठी बीजेएसच्यावतीने यंत्र उपलब्ध करून देण्याची ग्वाही संस्थेचे येवला तालुका संघटक श्रीश्रीमाळ यांनी दिली. प्रशांत परदेशी यांनी भूमिका विशद केली.

डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, पाण्याच्या संवर्धनासाठी विविध सामाजिक संस्था ही नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी पुढे आल्याने जसजशी जलसंवर्धनाची कामे पूर्ण होतील तसतसे नदीच्या ७१ किलोमीटर क्षेत्रात भूगर्भातील पाण्यात वाढ होईल, त्याने शेती उद्योगाला त्याचा मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

मोती मॅरेथॉनची घोषणा

लोकांचे शरिराबरोबरच मानसिक आरोग्य सुधारण्यास याचा उपयोग होईल, असे सांगून डॉ. सिंगल यांनी नदीचे सदिच्छा दूत म्हणून मोती नदी स्पर्धेचे आयोजन करण्याची घोषणा केली. मनोज साठे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT