मेन फिचरला क्लब करावी
NSK26H35259 : डॉ. सतीश पाटील
---
गुलाबराव देवकर, पवारांनी घात केला
---
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा गंभीर आरोप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणावर विश्वास ठेवावा, अशी स्थिती आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार हे राष्ट्रवादी पक्ष स्वत:चा समजतात. स्वत:च्याच घरात बँकेच्या संचालकपदाची उमेदवारी कशी राहील, याची त्यांनी दक्षता घेतली. माझा सहकारातील २० वर्षांचा अनुभव आहे. त्याचा जराही विचार केला नाही. माझ्यावर या दोघांनी अन्याय करून माझा घात केला, असा गंभीर आरोप माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे संचालक डॉ. सतीश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
माजी मंत्री डॉ. पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर ते बोलत होते. मला सोमवार (ता. १६)पर्यंत सांगण्यात आले, की तुमची उमेदवारी पक्की आहे. मंगळवारी (ता. १७) दुपारी पावणेतीनला मला सांगण्यात आले, की तुम्ही माघारी घ्या. मी एकटा पडल्याने मला माघार घ्यावी लागली. पक्षात कोणावर विश्वास ठेवावा, अशी स्थिती आहे. डॉ. सतीश पाटील पुढे आपल्याला जड जातील, असे वाटले. यामुळे माझा घात करून तिकीट कापले. यापुढे एकटा लढणार आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
----
सतीश पाटलांनी जबाबदारीने बोलावे
माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले, की सोमवारी विश्रामगृहात महायुतीची बैठक होती. आमदार अनिल पाटील, मी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, डॉ. सतीश पाटील उपस्थित होते. महायुतीत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आम्हाला सांगितले, की राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. आमचे अधिक आमदार, खासदार आहेत. यामुळे तुम्हाला आमदाराच्या प्रमाणात जागा देऊ. आम्ही त्यांना सांगितले, की चार जागा आम्हाला हव्यात. बैठकीत रात्री मंत्री महाजन यांना हस्तांदोलन करून माझी जागा पक्की ठेवा, असे सांगून डाॅ. सतीश पाटील निघून गेले. रात्री उशिरापर्यंत आम्ही महाजनांकडे ओबीसी जागा आम्हाला मिळायला पाहिजे, असा आग्रह धरला होता. ती जागा आमच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली नाही. डॉ. पाटील यांचा आरोप चुकीचा आहे. डॉ. पाटील यांचा घात करण्याचा संबंध नाही. तेही सोबत होते. त्यांच्यासमक्ष चर्चा झाली. महाजनांनी होय सांगितले होते. त्यानंतरही आम्ही महाजनांना सांगितले होते, की ओबीसी आम्हाला द्या. डॉ. पाटील यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. तीन जागाच मिळाल्या. चौथ्या जागेचा आग्रह होता. नंतर समजले, की तीनच जागा मिळाल्या. जो निर्णय झाला, तो महायुतीने घेतला, तो स्वीकारावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.