नाशिक

येवल्यातील डॉ. सौरिन शाह यांचे एमडी मेडिसिन पदवीत उल्लेखनीय यश येवल्यात सत्कार करत गौरव,आता नीट एसएस परीक्षेची तयारी

CD
फोटो-27397 येवला : एमडी मेडिसिन पदवीत उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. सौरिन शाह यांचा सत्कार करताना पदाधिकारी. डॉ. सौरिन शाह यांचे ‘एमडी’मध्ये यश सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ६ : येथील डॉ. सौरिन शाह यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी एम. डी. मेडिसिनची पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. स्वप्नील शहा यांचे ते पुत्र आहेत. या यशाबद्दल डॉ. सौरिन यांचा नुकताच सत्कार झाला. एमबीबीएसच्या पदवीनंतर नीट-पीजी परीक्षेतही यश मिळवत एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे एमडी मेडिसिन या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवत नुकतीच एमडी मेडिसिनचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. आता ते नीट एसएस परीक्षेची तयारी करीत आहेत. यशाबद्दल डॉ. सौरिन यांचा व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके, श्रीकांत खंदारे, शैलेश रुणवाल, डॉ. बाबासाहेब चव्हाण, डॉ. अविनाश जाधव, मोहन शिंदे आणि विशाल शिक्रे यांनी त्यांचा सत्कार केला. मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यशाची शिखरे गाठता येतात, असे श्री. झळके, श्रीकांत खंदारे यांनी सांगितले. डॉ. रेशमी शहा, प्रमिला शहा, सचिन तक्ते आदी उपस्थित होते. ...........

गाड्यांचे इंजिन धोक्यात! पेट्रोलमध्ये मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉलची भेसळ; कर्नाटक सरकारचे तेल कंपन्यांवर गंभीर आरोप

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

SCROLL FOR NEXT