फोटो - 16121
शेंदुर्णी : डॉ. सायली दिघे हिचा सत्कार करताना माजी उपसरपंच शंकर शिंदे, माजी उपसभापती पुंजाराम धुमाळ, पंडितराव दिघे व ग्रामस्थ.
-----
शेंदुर्णीतील पहिली महिला
डॉ. सायली दिघे हिचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता.२८ : शेंदुर्णी (ता. मालेगाव) येथील माजी सरपंच पंडितराव दिघे व प्रल्हाद दिघे यांची नात डॉ. सायली दिघे हिने ''बीएएमएस'' ही वैद्यकीय शिक्षणाची पदवी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाली. ग्रामस्थ, युवक मित्र मंडळ व माळमाथा मित्र मंडळातर्फे अंबिका देवी मंदिर चौकात तिचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच शंकर शिंदे होते.
व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी उपसभापती पुंजाराम धुमाळ, वसाका कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुभाष भागडे, माजी सरपंच पंडितराव दिघे, माजी उपसरपंच दौलतराव शिंदे, अनिल पाटील, प्रा. हिरालाल नरवाडे, माजी उपसरपंच आण्णा पाटील, हभप प्रकाश महाराज गांगुर्डे, प्रल्हाद दिघे, नथाबाई धुमाळ उपस्थित होते. प्रा. नरवाडे यांनी दिघे कुटुंबाच्या तीन पिढ्यांचा शिक्षणाचा संघर्ष मांडला. यावेळी अनिल पाटील यांनी डॉ. सायलीच्या यशाचे कौतुक करून पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. शिक्षक अंबालाल ठोंबरे यांनी नवीन पिढीने शिक्षणाच्या प्रवाहात रहावे असे सांगितले. डॉ. सायली म्हणाली की, माझ्या आजोबा व वडीलांच्या संघर्षाची जाणीव ठेवून मी वैद्यकीय सेवेचे शिक्षण यशस्वी केले. ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहिल, असे तिने नमूद केले. संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.