YEO26B27186
नाशिक : मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना डॉ. सुधीर जाधव,दत्तात्रय वैद्य व पदाधिकारी कार्यकर्ते.
------------
३०-२
शिवसेनेचे माजी सभापती
डॉ. जाधव ‘राष्ट्रवादी’मध्ये
------------
मंत्री भुजबळांच्या उपस्थितीत प्रवेश
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १५ : येथील पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवसेनेचे नेते डॉ. सुधीर जाधव यांनी सहकाऱ्यांसोबत मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
मंत्री भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथील कार्यालयात डॉ. जाधव यांनी कृषि, सहकार क्षेत्रासह पक्षातील नेत्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्री भुजबळ व समीर भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. जाधव यांनी घोंगडी भेट देऊन वाढदिवसानिमित्त भुजबळ यांचा सत्कार केला.
डॉ. जाधव यांच्यासह तालुका खरेदी- विक्री संघाचे माजी अध्यक्ष तथा धनगर समाज उन्नती मंडळाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वैद्य, खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक संतोष वैद्य, आनंदा वैद्य, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक जगन बोराडे, महेंद्र वैद्य, अनकाई विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष गणपत देवकर, शरद सोनवणे, अध्यक्ष वाल्मिक जाधव, माजी सरपंच नामदेव सोनवणे, राजूभाऊ नंदाळे, दिलीप गोरे, विशाल वनसे यांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.