Dr Vaje DNA request to Superintendent  sakal
नाशिक

नाशिक : डॉ. वाजेंच्या ‘डीएनए’साठी अधीक्षकांचे साकडे

कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला सांगाडा बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला सांगाडा बेपत्ता डॉ. सुवर्णा वाजे यांचा की अन्य दुसऱ्या महिलेचा, हे पडताळून पाहण्यासाठी ‘डीएनए’चा अहवाल लवकरात लवकर ग्रामीण पोलिसांना द्यावा, असे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिंडोरी रोडवरील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅब) पाठविले आहे. दरम्यान, डीएनएचा अहवाल काय येतो, यावरून डॉ. सुवर्णा वाजे बेपत्ता प्रकरणाचा पुढील तपास केला जाणार आहे.

महापालिकेच्या मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने अंबड पोलिस ठाण्यात दिली होती. तत्पूर्वीच, वाडीवाऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रायगड नगरजवळ रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनात पूर्णत: जळालेल्या अवस्थेत महिलेचा सांगाडा आढळला होता. वाडीवऱ्हे पोलिसांनी तपास केला असता, हा सांगाडा महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच जळालेली कार वाजे यांचीच असल्याचे चेसीज नंबरच्या मदतीने पोलिसांनी स्पष्ट केले. दुसरीकडे बेपत्ता तक्रारीचा तपास अंबड पोलिस करत असून, त्यांनी तांत्रिक विश्‍लेषण व कुटुंबाकडून माहिती मिळवली आहे. डॉ. वाजे यांचे वाहन आढळलेल्या ठिकाणापर्यंत जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले जात असून, सिडकातील स्टेट बँक व अन्य वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्हींसह वाडीवऱ्हेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून या फुटेजसह डॉ. वाजे यांच्या मोबाईलच्या लोकेशनचे तांत्रिक विश्‍लेषण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT