dr vaje murder case husband brother use sanitizer for Dispose corpse
dr vaje murder case husband brother use sanitizer for Dispose corpse sakal
नाशिक

डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात सॅनिटायझर वापरल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना आग लावण्यासाठी संशयित संदीप वाजे याने कोरोनाकाळात जमवलेल्या सॅनिटायझरचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.संदीप वाजेचा संशयित मावसभाऊ यशवंत म्हस्के यानेच संदीपला सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचे सांगत, पोलिसांनी न्यायालयाकडे म्हस्केच्या पोलिस कोठडीत आणखी सहा दिवसांची मुदतवाढ मागितली.

डॉ. सुवर्णा वाजे यांनी आत्महत्या केल्याचा बनाव संशयितांनी संगनमताने केल्याचा संशय नाशिक ग्रामीण पोलिसांना आल्याने, दोघांचा मोबाईल संवाद व घटनेच्या दिवशी दोघांमध्ये झालेले तब्बल १२ ते १४ फोन कॉल यावरून हत्याकांडात म्हस्केचा महत्त्वाचा सहभाग असल्याने पोलिसांनी त्यास अटक केली. त्याला न्यायालयाने बुधवार (ता. २३)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज मुदत संपल्याने पोलिसांनी म्हस्केला पुन्हा न्यायालयात हजर केले. या वेळी म्हस्के याने न्यायालयासमोर संदीप वाजेला डॉ. सुवर्णा यांची हत्या करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला दिल्याची कबुली दिल्याचे सरकारी वकील जयदेव रिके यांनी सांगितले. त्यामुळे आता डॉ. सुवर्णा वाजे यांना सॅनिटायजरचा वापर करून वाहनासह जिवंत जाळण्यात आले, की त्यांची हत्या करून वाहनाला आग लावण्यात आली, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT