nashik oxygen leak esakal
नाशिक

डॉ. झाकीर हुसेन ऑक्सीजन गळती दुर्घटना : कारवाईसंदर्भात संशय

विक्रांत मते

नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील (dr. zakir hussain oxgen leak incident) दुर्घटनेला जबाबदार धरतं पुणे येथील तायो निप्पॉन कंपनीला (tayo nippon company) काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहे. मात्र या कंपनीकडून स्वस्तात ऑक्सिजन उपलब्ध होत असून दुसरीकडे स्थानिक कंपनीकडून दुप्पट्टीपेक्षा अधिक दराने ऑक्सिजन पुरवठा केला जातो. ही जमेची बाजू लक्षात असताना त्याच कंपनीला का काळ्या यादीत टाकले जात आहे, कारवाई करायची तर दोन्ही कंपनीवर का नाही, असा सवाल उपस्थित होत कारवाईसंदर्भात संशय व्यक्त होत आहे.

कारवाईसंदर्भात संशय

२१ एप्रिल रोजी महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात टाकीमध्ये ऑक्सिजन भरताना गळती होऊन २४ रुग्णांचा मृत्यू ओढावला. या घटनेची राज्य सरकारने दखल घेत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. समितीने नुकताचं राज्य शासनाला अहवाल सादर केला. अहवालात दोषी धरण्यात आलेल्या पुणे येथील तायो निप्पॉन व स्थानिक जाधव सप्लायर्स या कंपन्यांवर अनुक्रमे २२ लाख व दोन लाख रुपयांची दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या. नोटीस बजावल्यानंतर कारवाईची प्रक्रिया पूर्ण होत असतानाचं आता तायो निप्पॉन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

फक्त तायो निप्पॉन कंपनीच का?

वास्तविक दोन कंपन्यांना जबाबदार धरतं दंडात्मक कारवाईच्या नोटीस बजावल्या असताना तायो निप्पॉन या एकमेव कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या हालचालींमुळे प्रशासनाभोवती संशयाचे ढग जमा झाले आहेत. काळ्या यादीत समावेश करायचा असेल तर जाधव ट्रेडर्स या कंपनीचा देखील काळ्या यादीत समावेश करणे गरजेचे आहे, असे असताना फक्त तायो निप्पॉन कंपनी का? असा सवाल उपस्थित होत आहे. तायो निप्पॉन कंपनी सोबत पुढील दहा वर्षांसाठी १५ रुपये क्युबिक मीटरने ऑक्सिजन पुरवठ्याचा करार आहे. जाधव ट्रेडर्स या स्थानिक पुरवठादार कंपनीने ३९ रुपये क्युबिक मीटर दराने पुरवठा करणार असल्याचे समजते. दुप्पटीपेक्षा जादा दराने ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी स्पर्धक व कमी किमतीने ऑक्सिजन पुरवठादार कंपनीला काळ्या यादीत टाकून बाद करण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT