divya upsc esakal
नाशिक

आई-वडिलांपाठोपाठ दिव्याही अधिकारी; घरात तिसरी दिव्याची गाडी

अरूण मलाणी

नाशिक : शालेय जीवनापासून अधिकारी होण्याचे स्‍वप्‍न बघण्यास सुरवात केली व स्‍वप्‍नांचा पाठलाग सुरू ठेवला. यूपीएससी (UPSC) परीक्षेत यश मिळविताना अखेर दिव्‍या अर्जुन गुंडे हिने स्‍वप्‍नपूर्ती केली. आई-वडील प्रशासकीय सेवेत असल्‍याने आता गुंडे कुटुंबात दिव्‍याच्‍या रूपाने तिसरी दिव्‍याची गाडी दाखल झाली आहे.

आई-वडिलांपाठोपाठ प्रशासकीय सेवेत दाखल

दिव्‍याचे शालेय शिक्षण फ्रावशी ॲकॅडमीत झाले. आयपीएसई बोर्डातून तिने दहावीत ९२ टक्‍के गुणांसह यश मिळविले. परंतु शालेय जीवनापासून अधिकारी होण्याचे स्‍वप्‍न उराशी बाळगताना तिने जाणीवपूर्वक कला शाखेची निवड केली. बारावीपर्यंत एचपीटी महाविद्यालयातून शिक्षण घेतल्‍यानंतर पुढे पदवीकरिता पुण्यातील फॉर्गिसन कॉलेजची निवड केली. अंतिम वर्षात असल्‍यापासून स्‍पर्धा परीक्षांना सुरवात केली.

आई जिल्‍हाधिकारी, वडील अतिरिक्‍त सीईओ

दिव्‍याची आई नयना गुंडे सध्या गोंदियात जिल्‍हाधिकारी आहेत, तर वडील अर्जुन गुंडे नाशिक जिल्‍हा परिषदेत अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेतील अनुभवासोबत दिव्‍याला स्‍पर्धा परीक्षांच्‍या तयारीकरिता आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.

नाशिकमध्ये घडले व्यक्‍तिमत्त्व

आजवरच्‍या प्रवासात शालेय जीवन महत्त्वपूर्ण होते. या कालावधीत व्यक्‍तिमत्त्व विकास घडल्‍याचे दिव्‍याने सांगितले. आयसीएसई बोर्डातील शिक्षणक्रमामुळे अभ्यासाचा पाया भक्‍कम झाला. कला शाखेच्‍या निवडीचाही फायदा झाल्‍याचे तिने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Marathi News Live Updates : 'आयुष्मान भारत' योजनेतंर्गत ६० कोटी भारतीयांना ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

SCROLL FOR NEXT