नाशिक

पंचनाम्यांसाठी आमदार सुहासकांदे ॲक्शन मोडमध्येखातेप्रमुखांची आढावा बैठक; उद्या फिल्डवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांकडून कामाचा लेखाजोखा

CD
पान-३ अँकर फोटो ओळी -11147 नांदगाव : तालुक्यातील खातेप्रमुखांच्या दुष्काळ आढावा बैठकीत बोलताना आमदार सुहास कांदे. शेजारी  नगराध्यक्ष सागर हिरे, उपविभागीय अधिकारी शीतल घोलप, तहसीलदार सुनील सैंदाणे आदी. पंचनाम्यांसाठी आमदार सुहास कांदे ‘ॲक्शन मोड’वर खातेप्रमुखांना सूचना; उद्या कृषी अधिकाऱ्यांची बैठक नांदगाव, ता. ८ : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळावी, यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना आमदार सुहास कांदे यांनी दिल्या. पंचनाम्याअभावी एकही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहू नये, तसेच तालुक्यातील एकही शेतकरी पंचनाम्यांच्या प्रक्रियेबाहेर राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आमदार कांदे यांच्या निवासस्थानी गुरुवारी कृषी, महसूल, पंचायत समिती, पशुसंवर्धन यांसह विविध विभागांच्या खातेप्रमुखांची विशेष आढावा बैठक झाली. तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीचे पंचनामे, पाणीटंचाई आणि चाऱ्याची उपलब्धता याबाबत आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम सुरू असून, निर्धारित उद्दिष्टाच्या सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित काम वेगाने करण्यासाठी आमदार कांदे यांनी प्रशासनाला सूचना केल्या. पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे तत्परतेने सादर करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीला अग्रक्रम देण्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीतील प्रत्यक्ष पीकपेरा आणि नुकसान याची खातरजमा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायकांची शुक्रवारी (ता. ९) आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. प्रत्यक्ष किती काम झाले, कोणत्या गावांत पंचनामे पूर्ण झाले, कुठे अडचणी आहेत आणि पात्र शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे का, याचा थेट आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. पंचनाम्यांची कार्यवाही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष नुकसानीशी सुसंगत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, यावर आमदार कांदे यांनी विशेष भर दिला आहे. नगराध्यक्ष सागर हिरे, उपविभागीय अधिकारी शीतल घोलप, तहसीलदार सुनील सैंदाणे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे, मुख्याधिकारी श्यामकांत जाधव, मनमाडचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. .............

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

SCROLL FOR NEXT