नाशिक

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या

CD
SGR26B07584 धुळे : जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे व कार्यकर्ते. --------- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवेदनाद्वारे मागणी सकाळ वृत्तसेवा सोनगीर , ता. १७ : धुळे जिल्ह्यात मोठ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे आर्थिक नुकसान व पाणीटंचाईमुळे गंभीर संकट उभे ठाकले असताना प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात भरीव आर्थिक मदत देण्याऐवजी शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत अत्यंत तुटपुंजी असून, संतापजनक आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने भरीव मदतीसह विविध सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली. या संदर्भात शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पाच हजार रुपये अग्रीम मदतीचे निकष व कधी वितरण करणार आदी बाबी स्पष्ट करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी, तसेच तातडीने भरीव अतिरिक्त मदत द्यावी. शेतकऱ्यांवरील पीककर्ज वसुली थांबवून कर्जमाफी झालेल्यांना तत्काळ निरंक दाखले द्यावेत व नवीन पीककर्ज उपलब्ध करावे. बँक ऑफ इंडिया (चिमठाणा) व युनियन बँक ऑफ इंडिया (दोंडाईचा) शाखांमध्ये कर्जमाफीनंतरही व्याज आकारणी व वसुली होत असल्याच्या तक्रारींची चौकशी व्हावी. पीकविमा, घरकूल व अनुदानाच्या रकमांवरील बँकांचा अनावश्यक ताबा काढावा. पशुधनासाठी तातडीने चारा छावण्या व चारा आगार सुरू करावेत व टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करावी. शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्याचा पोकरा योजनेत समावेश करावा व बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना त्वरित दुरुस्त कराव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँका व प्रशासकीय विभागांची तातडीने आढावा बैठक घेऊन लेखी निर्देश द्यावेत, या मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेतर्फे शिरपूर ते धुळे असा पायी शिंगाडे मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी छोटू पाटील, गिरीश देसले, कल्याण बागल, मनोज पवार, मनोज पाटील, शैलेश सोनार, अनिल पाटील आणि राकेश पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT