नाशिक

शिरपूर तालुका संकटात

CD
धुळे : टुडे पान ४ साठी --- फोटो क्रमांक ः 31908 भटाणे : सुकलेल्या पिकाची पाहणी करताना काशीराम पावरा, के. डी. पाटील, धनंजय साळुंखे, शेतकरी रणजीत देसले, शेखर पाटील, सुनील पाटील, खंडू कोळी, प्रकाश पाटील आदी. -- दुष्काळामुळे शिरपूर तालुका संकटात - भरीव आर्थिक मदतीसाठी आमदार पटेल, पावरा यांचा पाठपुरावा सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. १० : शिरपूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर मतदारसंघाचे आमदार काशिराम पावरा यांनी शुक्रवारी (ता. १०) भटाणे परिसरातील शेतात प्रत्यक्ष दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी केली. त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल आणि मी पाठपुरावा करत असल्याची माहिती आमदार पावरा यांनी दिली. पावसातील खंडामुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था पाहून आमदार पावरा यांनी चिंता व्यक्त केली. उपस्थित शेतकऱ्यांनी सध्याचा खरीप हंगाम हातातून गेल्याचे सांगत, पावसाच्या अनिश्चिततेमुळे आगामी रब्बी हंगामावरही संकट निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे शासनाने विलंब न करता तातडीने भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बाजार समिती सभापती के. डी. पाटील, भटाणेचे पोलिस पाटील धनंजय साळुंखे, शेतकरी रणजीत देसले, शेखर पाटील, सुनील पाटील, खंडू कोळी, प्रकाश पाटील, भूषण वाघ आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना धीर देताना आमदार पावरा म्हणाले, की आमदार पटेल आणि आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६ मधील परिस्थिती विचारात घेऊन पहिल्याच टप्प्यात शिरपूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश केला आहे. तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून वेगाने पूर्ण करण्यात आले असून, त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर केला जात आहे. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Manipur Violence : मणिपूर पु्न्हा पेटलं! २४ तासांत ९ जणांची हत्या, १४ घरांना लावली आग; कांगपोकपी जिल्ह्यात बंदची हाक

High Court Security Breach : तोंडाला रुमाल बांधून हायकोर्टात घुसल्या दोन महिला; प्रतिबंधित क्षेत्रात धुडगूस घालत सीसीटीव्ही फोडले!

Numerology: 'या' मूलांकांचे लोक नेहमी न्यूनगंडाने घेरलेले असतात; इतरांच्या बोलण्याचा मनावर खोल परिणाम होतो

Karmad Tomato Market : करमाडच्या टोमॅटो बाजारपेठेत रोज ५० लाखांची उलाढाल! चार महिने चालतो हंगाम; रोख पेमेंट, चांगला भाव अन् ५०० जणांना रोजगार

SCROLL FOR NEXT