नाशिक

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २२३ कोटींची मदत

CD
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २२३ कोटींची मदत --- जिल्ह्यातील ४.४७ लाख बाधितांना सरकारचा आधार सकाळ वृत्तसेेवा नाशिक, ता. १२ : जिल्ह्यातील दुष्काळाने बाधित चार लाख ४७ हजार ४३ शेतकऱ्यांंच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे २२३ कोटी ५२ लाख १५ हजारांची अग्रिम मदत जमा करण्यात आली. दिवाळीसाठी मदतीची रक्कम बँक खात्यात आल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला. राज्यभरात यंदा खरीप हंगामातील पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, बळीराजा दुष्काळाने होरपळत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विविध प्रकारच्या १२ सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर, पशुधन व जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याच दरम्यान, नियमित दुष्काळी मदतीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्णत्वास विलंब होणार असल्याने शेतकऱ्यांना तातडीचे म्हणून पाच हजारांचे अग्रीम अनुदान वितरित करण्यात आले. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दुष्काळ कितीही मोठा असला, तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. कोट आर्थिक मदत, कर्जविषयक सवलती, पाणीपुरवठा, चारा, रोजगार आणि जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांचे हित आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संरक्षण हेच शासनाच्या दुष्काळ निवारण उपाययोजनांचे केंद्रबिंदू आहे. - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी अग्रीम मदतप्राप्त शेतकरी बागलाण ५२४९१, चांदवड ३८१२९, देवळा २२६४२, इगतपुरी १४४०६, कळवण १९५८९, मालेगाव ७२००६, नांदगाव ३६१२१, निफाड ५५२४६, पेठ ९५१४, सिन्नर ४७७१०, सुरगाणा १४५७७, त्र्यंबकेश्वर १२९७३, येवला ५१६३९, एकूण ४,४७,०४३ पॉइंटर - मालेगावमधील सर्वाधिक ७२,००६ शेतकऱ्यांना मदत - पेठमधील ९,५१४ बाधितांच्या बँक खात्यावर अनुदान - अग्रीम मदतीसाठी शेतकऱ्यांनी मानले सरकारचे आभार - दुष्काळग्रस्तांसाठी सरकारतर्फे १२ विविध उपाययोजना - शेतकऱ्यांना जमीन महसूल भरण्यापासून सवलत - शेतकऱ्यांच्या पीक कर्जांचे होणार पुनर्गठण - कृषी कर्जवसुलीस स्थगिती, सक्तीच्या वसुलीस मनाई - कृषिपंपांच्या चालू वीजबिलात सवलत - विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी बिल्डर जितेंद्र मेहता यांची दीड तास चौकशी

SCROLL FOR NEXT