नाशिक

पैसवारी पन्नास पैशांच्या आत

CD
धुळे : टुडे १ साठी, मेन -- लोगो छायाचित्र क्रमांक ः 34333 -- पैसवारीत ६७६ गावे ५० पैशांच्या आत -- दुष्काळाची दाहकता स्पष्ट; खरीप हंगाम निसटल्याने शेतकरीही संकटात सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ : यंदाच्या खरीप हंगामात अपुऱ्या, असमान पावसामुळे जिल्ह्यातील शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या खरीप व रब्बी पिकांच्या सुधारित पैसेवारीनुसार जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत निश्चित करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील सर्वच ६७६ महसूली गावांमधील पीक स्थितीची गंभीर स्थिती समोर आली आहे. तसेच, दुष्काळाची दाहकताही स्पष्ट झाली आहे. - यंदाच्या हंगामात जून महिन्यात उशिरा पावसाचे आगमन झाले. जुलै महिन्यात काही भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे प्राथमिक टप्प्यात पिकांचे नुकसान झाले. नंतर ऑगस्ट, सप्टेंबर या पिक वाढीच्या महत्त्वाच्या काळात पावसाने दीर्घ खंड दिला. त्यामुळे शेतातील पिके सुकली. महसूल व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाहणीनंतर शासनाने २६ सप्टेंबरला जिल्ह्यातील चारही तालुके दुष्काळी घोषित केले. आता सुधारित पैसेवारीने दुष्काळाच्या दाहकतेवर शिक्कामोर्तब केले आहे. - प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने बाधित भागातील शेतकऱ्यांना विविध शासकीय सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यात जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती, कृषीपंपांच्या चालू वीज बीलात सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणण्याचा समावेश आहे. परंतु, खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने केवळ सवलतींवर समाधान न मानता शासनाकडून प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. - टंचाई चाऱ्याचा प्रश्‍न दुष्काळाच्या या संकटामुळे जिल्ह्यातील बळीराजा पूर्णपणे आर्थिक विवंचनेत सापडला आहे. बियाणे, खते, मशागतीसाठी घेतलेला खर्चही निघणे यंदा शक्य झाले नाही. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील निर्माण झाली असून जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाने घोषित केलेल्या सवलती कागदावरच न राहता त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शासनाने भरीव आर्थिक पॅकेज जाहीर न केल्यास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ जिल्ह्यातील सर्व गावे बाधित जाहीर झालेल्या सुधारित पैसेवारीनुसार जिल्ह्यातील सर्वच ६७६ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली आहे. यात खरीप हंगामातील ५९६ गावे आणि रब्बी हंगामातील ८० गावांचा समावेश आहे. तालुकानिहाय पाहणीनुसार साक्री तालुक्यातील सर्वाधिक २२७ गावे (१९८ खरीप आणि २९ रब्बी) बाधित झाली आहेत. त्यापाठोपाठ धुळे तालुक्यातील १७० गावे पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेली आहेत. याशिवाय शिंदखेडा तालुक्यातील १४३ गावे (१०९ खरीप व ३४ रब्बी) आणि शिरपूर तालुक्यातील १३८ गावे (१२१ खरीप व १७ रब्बी) यामध्ये समाविष्ट आहेत. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

Latest Marathi News Live Update : तुकाराम मुंढेंनी पुण्यात केली दिवाळी फराळाची तपासणी; लाडू हाताने कुस्करला अन्...

'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

SCROLL FOR NEXT