नाशिक

रब्बी क्षेत्रात घट

CD
ॲंकर -- 35107 संग्रहित छायाचित्र -- धुळे जिल्हा रब्बी क्षेत्रात २६ टक्क्यांची घट दुष्काळाचा फटका; पुरेशा पाण्याअभावी बळीराजाचे नियोजन कोलमडले सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळस्थिती आणि पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका जिल्ह्याला बसला. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातून गेल्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाने रब्बी हंगामाकडून काहीशी आशा बाळगली होती. परंतु, अत्यल्प पाऊस आणि जलसाठ्यांच्या तुटवड्यामुळे आता रब्बीच्या पेरणी क्षेत्रालाही मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत २०२६- २०२७ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित पेरणी आराखड्यातून ही स्थिती स्पष्ट झाली आहे. कृषी विभागाच्या नियोजनातील आकडेवारीनुसार, रब्बी हंगामात उसासह एकूण सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख नऊ हजार ३३९ हेक्टरवरून घसरून थेट ८० हजार ४५० हेक्टरवर आले आहे. यात तब्बल २६.४ टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे. उसाचे क्षेत्र वगळता रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र ७९ हजार ९५० हेक्टर असून या हंगामात उसाशिवाय एकूण ७८ हजार ६३१ टन उत्पादन आणि प्रतिहेक्टरी ९८४ किलो उत्पादकतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. - मका क्षेत्र वाढणार पाण्याच्या टंचाईमुळे प्रमुख पिकांच्या क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. रब्बी तृणधान्य वर्गात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ४४ हजार ७४० हेक्टरवरून थेट ३३ हजार हेक्टरवर आले आहे. तसेच कडधान्य वर्गातील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र ३२ हजार १८६.६० हेक्टरवरून २८.५ टक्क्यांनी घटून २३ हजार हेक्टरवर आले आहे. मात्र कमी पाणी लागणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रब्बी मक्याच्या क्षेत्रात वाढ झाली असून हे क्षेत्र १३ हजार ४७९ हेक्टरवरून ३३.५ टक्क्यांनी वाढून १८ हजार हेक्टरवर पोहोचणार आहे. चौकट उन्हाळी हंगामासही फटका दुष्काळाची ही दाहकता केवळ रब्बी पुरतीच मर्यादित नसून आगामी उन्हाळी हंगामावरही त्याचे सावट असणार आहे. उन्हाळी हंगामात उसासह चार हजार २१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित असून सर्वसाधारण सात हजार ४६९ हेक्टरच्या तुलनेत ही घट तब्बल ४३.६ टक्के इतकी प्रचंड आहे. यात उन्हाळी भुईमूग दोन हजार ५०० हेक्टर, उन्हाळी मका ८०० हेक्टर आणि उन्हाळी बाजरी ७०० हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आली आहे. पावसाच्या या दुष्टचक्रामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT