नाशिक

सरसकट पंचनामे होण्यासाठी पाठपुरावा भाजपकडून तालुक्यात दुष्काळाची पाहणी

CD
फोटो-22964 सिन्नर ः पूर्व भागात दुष्काळी स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधताना उदय सांगळे. शेजारी कृषी अधिकारी व शेतकरी. सिन्नर तालुक्यात सरसकट पंचनामे करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून दुष्काळाची पाहणी सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ८ ः शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट असून, या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सरसकट पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करणार आहे. पंचनामे करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपचे युवा नेते उदय सांगळे यांनी दिली. भाजपतर्फे तालुक्याच्या पूर्व भागातील मिरगाव, दुशिंगपूर, वावी, घोटेवाडी येथे दुष्काळी पाहणी दौरा करण्यात आला. या वेळी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, ज्ञानेश्वर दुरगुडे, मंडळ कृषी अधिकारी विनोद सांगळे, उपकृषी अधिकारी दादासाहेब जोशी, महादेव मुसळे, संगीता दवंगे, गायत्री जाधव, राजश्री हासे, सहाय्यक कृषी अधिकारी निकम आदींसह ग्रामसेवक सहभागी झाले होते. उदय सांगळे यांनी सरसकट पंचनामे होण्यासाठी आपण ही मागणी वरिष्ठ स्तरापर्यंत मांडणार असून, पाहणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्याचाही प्रयत्न केला जाईल. अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न कठीण होणार आहे. त्यासाठी टँकर, चारा डेपोचे नियोजन गरजेचे असून, त्या दृष्टीनेही पाठपुरावा आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Final List : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीची अंतिम यादी जाहीर; अनेकांचा पत्ता कट, पी. एन. पाटील गटाला धक्का, अनेकजण सतेज पाटलांच्या संपर्कात

India vs Pakistan महामुकाबला! कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात, ८ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा; जाणून घ्या Asia Cup चे वेळापत्रक

लोकं म्हणतील नानाचा मुलगा असा कसा? दुसऱ्या मुलाचा तिरस्कार करायचे नाना, आयुष्यभर मनात राहिली ती सल

Latest Marathi News Live Update : बंगळुरू येथे सीजेपीचे आंदोलन सुरू, आंदोलनात ध्रुव राठी सहभागी

दूध भेसळप्रकरणी सोनई डेअरीवर FDAची कारवाई! सहा दूध नमुन्यांमध्ये डिटर्जंट; १६,७३० लिटर दूध नष्ट

SCROLL FOR NEXT