नाशिक

मोफत मिळणार्‍या चार्‍याचे वाढते भाव

CD
(पान ४ ला ॲंकर) (लोगो : चित्र दुष्काळाचे) KPD26B13568 कापडणे : शेतातील चारा गोठ्यात साठविण्यासाठी नेतांना शेतकरी बाजीराव पाटील. -------- मोफत मिळणाऱ्या चाऱ्याचे वाढले दर ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव; शेतकऱ्यांचा चारा संकलनावर भर सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. ३० : धुळे जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी मका, ज्वारी, बाजरी पिके दोन ते अडीच फुटांवरच वाळून गेली असून, शेतकरी हेच पीक आता चारा म्हणून गोळा करू लागले आहेत. ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव मिळत आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून चांगला पाऊस होत होता. त्यामुळे मुबलक चारा उपलब्ध होता. शेतात पडलेला मक्याचा चारा मोफत न्यायला देखील कोणी तयार नव्हते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना चारा शेतातच जाळून टाकावा लागत होता. मात्र, यंदा चित्र पूर्णपणे पालटले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे हिरवा चारा संपुष्टात आला असून, तोच टाकाऊ समजला जाणारा वाळलेला चारा आता बैलगाडीभर एक ते दोन हजार रुपये दराने विकला जात आहे. शेतकरी सध्या शेतातील प्रत्येक काडी न् काडी वेचून साठवणूक करत आहेत. जनावरांसमोर चारा टंचाईचे संकट उभे राहू नये. यासाठी दिवस- रात्र कष्ट घेऊन कडबा, वैरण गोळा करण्याचे काम सुरू आहे. दुभत्या जनावरांसह बैलांच्या जगवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, प्रशासनाला चाराटंचाईवर उपाययोजना म्हणून आगामी दोन महिन्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पशुसंवर्धन विभागाने चारा बियाणे वाटप, पाणीटंचाई असलेल्या गावांत टँकरने पाणीपुरवठा करून चारा उत्पादनास प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ----- दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा धुळे जिल्ह्यात दुभत्या गायी म्हशींचे प्रमाण अधिक आहे. दापुऱ्यासारखी काही गावे दुधग्राम म्हणून ओळखली जातात. इतर गावांमध्येही दुभत्या जनावरांची संख्या लक्षणीय आहे. येत्या दोन- तीन महिन्यात हिरवा चारा कसा उपलब्ध करावा, ही चिंता शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Marathi News Live Updates : रखडलेल्या तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाकरे गटाचे रास्ता रोको

RailMadad: प्रवासात तुमच्या सामानाची चोरी झाल्यास रेल्वेकडून भरपाई मिळते का? जाणून घ्या काय आहेत नियम?

Pandharpur News : ऊस दरावरून पंढरपूरात वाद चिघळला; विठ्ठल कारखान्यावर आमदार अभिजीत पाटील समर्थक विरुद्ध शेतकरी संघटना आमने-सामने

SCROLL FOR NEXT