धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
लोगो छायाचित्र क्रमांक ः 33688
--
जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीसह विक्रीस सक्त मनाई
-
दुष्काळी स्थितीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; उल्लंघनावर कायदेशीर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा व आगामी काळात चाराटंचाईचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील चारा स्थानिक पशुधनासाठी राखीव ठेवत, जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर कोणत्याही प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
-
शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयानुसार धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या चारही तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ दुष्काळ घोषित झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनाच्या चाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. स्थानिक पातळीवरील चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागांत विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे जिल्ह्यात गंभीर चाराटंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
-
‘या’ चाऱ्यांचा समावेश
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. यामध्ये हिरवा चारा, कडबा, सर्व प्रकारची कुट्टी, पेंढा, टीएमआर (टोटल मिक्स्ड रेशन) अर्थात संपूर्ण मिश्रित पशुखाद्यासह इतर सर्व प्रकारच्या पशुखाद्यांचा समावेश आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. शासकीय योजनांअंतर्गत होणारी चारा वाहतूक, तसेच पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीस या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. हे आदेश ७ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाले असून, पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील. चारा उत्पादक, व्यापारी, विक्रेते व वाहतूकदारांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.