नाशिक

दुष्काळामुळे सातपुड्यातील ऐतिहासिक अश्व स्पर्धा प्रथमच रद्द

CD
(टुडे पान एक अँकर) फोटो : NSK26H32262 धडगाव : पोलिस ठाण्यात आयोजित बैठकीस उपस्थित पोलिस निरीक्षक सुनील भाबड. समोर हरसिंग पावरा, धनसिंग पावरा, राजू पावरा, फतसिंग पावरा. --- दुष्काळामुळे सातपुड्यातील अश्व स्पर्धा प्रथमच रद्द पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला आयोजकांचा प्रतिसाद नंदुरबार, ता. १३ : दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोषमाळ बुद्रुक आणि छापरी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सातपुड्यातील ऐतिहासिक अश्व स्पर्धा म्हणजे घोड्यांच्या शर्यती रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोजकांनी घेतला आहे. सामाजिक जबाबदारीचे भान जपत आयोजकांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. धडगाव तालुक्यातील रोषमाळ बुद्रुक गावात १८ ऑक्टोबरला, तर छापरीला ३१ ऑक्टोबरला अश्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार होते. या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबरला धडगाव पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजक आणि प्रतिष्ठित नागरिकांची एक विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, नागरिकांपुढील भीषण पाणीटंचाईचे संकट आणि ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात, तसेच धडगाव तालुक्यात दुष्काळाचे मोठे सावट आहे. अशा गंभीर परिस्थितीत मोठ्या स्वरूपातील स्पर्धांचे आणि उत्सवांचे आयोजन टाळणे योग्य राहील, अशी भूमिका बैठकीत मांडत पोलिस प्रशासनाने अश्व स्पर्धा रद्द करण्याचे आवाहन केले. पोलिस प्रशासनाच्या या आवाहनाला आयोजकांनी तत्काळ आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. अश्व स्पर्धांचे आयोजक हरसिंग पावरा, धनसिंग दादला पावरा, पोलिसपाटील राजू पावरा आणि फतसिंग पावरा यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही ठिकाणच्या स्पर्धा रद्द करण्यास सहमती दर्शविली. या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळाच्या कठीण काळात उत्सव व स्पर्धांपेक्षा नागरिकांच्या आणि जनावरांच्या अडचणी महत्त्वाच्या आहेत, याचा विचार करून आयोजकांनी घेतलेला हा निर्णय सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यातील समन्वयातून सामुदायिक हिताला दिलेले हे प्राधान्य इतर गावांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Water Supply : टंचाईग्रस्त गावांत पाण्याची गुणवत्ता तपासणार; १८ हजार ६५० नागरिकांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी

Aadhaar Server Down : आधार सर्व्हर ठप्प, नवीन परिपत्रकाचा पेच; दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीचा खोळंबा!

SCROLL FOR NEXT