नाशिक

कापडणे कापसावर नांगर

CD
(पान ४ ला मेन) KPD26B13606 सुट्रेपाडा : दुष्काळात कापसाची खुंटलेली वाढ. -------- कापसावर दिवाळीपूर्वीच फिरविला नांगर धुळे जिल्हा : दुष्काळामुळे कोरडवाहू कापसाचा हंगाम संपुष्टात सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता.४ : यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच टाकून गेला. पावसाने पाठ फिरवल्याने धुळे जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील कापूस पीक पूर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांनी हतबल होऊन कापसाच्या पिकावर नांगर फिरविण्यास सुरुवात केली आहे. कधी नव्हे ते दिवाळीच्या तोंडावर शेतात कापसाऐवजी उजाड शिवार दिसत असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत आहे. ---------- धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू कापसाची लागवड होते. जून- जुलैमध्ये पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारली. मात्र, ऑगस्टनंतर पाऊस गायब झाला. तब्बल दीड ते दोन महिने पावसाचा खंड पडल्याने कापसाची झाडे वाळून गेली. बोंडे उमललीच नाहीत, फुलगळ झाली आणि झाडे सुकून गेली. उत्पादनात मोठी घट एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती एकरी एक ते दोन क्विंटलही कापूस लागला नाही. वेचणीसाठी मजूर लावूनही खर्च निघणार नाही, ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस उपटून टाकण्याचा निर्णय घेतला. अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने रोटाव्हेटर व नांगर फिरवून शेत मोकळे केले आहे. एकरी खर्च अधिक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे, खते, औषधे, मजुरीसाठी एकरी १५ ते २० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता. तो सर्व खर्च पाण्यात गेला आहे. सावकाराचे कर्ज, बँकेचे कर्ज कसे फेडायचे, दिवाळी कशी साजरी करायची, पैसा कुठून आणायचा आदी प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. शेतकऱ्यांना काहीसा आधार शेतकऱ्यांना दिलासा देणारी बाब म्हणजे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला आहे. तसेच, कर्जमाफीही जाहीर झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा होत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळाला आहे. ----------- शासनाची मदत तोकडी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत पाच हजार रुपये पुरेसे नाहीत. पीकविमा मिळाल्यास रब्बी हंगामासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा आधार मिळेल. - आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update: नालासोपाऱ्यात आगीच्या तांडव; दोन गाड्या जळून खाक

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT