नाशिक

शेतकऱ्यांना मदत, मग शेतमजुरांचे काय?

CD
शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांना मदतीची गरज हाताला काम नाही; शेतमजुरांची दिवाळी अंधारातच सकाळ वृत्तसेवा चांदवड, ता. १४ : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि रोषणाईचा सण. घरात दिवे लागावेत, लेकरांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, नवीन कपडे आणि गोडधोडाने सण साजरा व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतमजुरांच्या घरात यंदा दिवाळीचा दिवा लागणार कसा, असा प्रश्न आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नाही. शेतात राबणाऱ्या मजुरांचाही रोजगार हिरावला आहे. त्यामुळे शेतमजुरांच्या वाट्याची उपेक्षा शासनाने थांबवावी. अशी मागणी आहे. चांदवड तालुक्यासह दुष्काळाची तीव्रता असलेल्या ग्रामीण भागात शेती संकटात आहे. अनेक ठिकाणी मका, चारा आणि इतर पिकांची वाढ झालेली नाही. पिकांचे नुकसान झाल्याने शेतीची कामेही कमी झाली आहेत. निंदणी, खुरपणी आणि कापणीची कामे नसल्याने रोजंदारीवर जगणाऱ्या मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. मजुरांचे कुटुंब रोजच्या कमाईवर अवलंबून असते. दिवसभर काम मिळाले, तरच संध्याकाळी चूल पेटते. काम नसल्याने किराणा, औषधे, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळात शेतीसोबत मजुरांचाही रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे दुष्काळात रोजगार गमावलेल्या शेतमजुरांनाही दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांची दिवाळी उजळविताना शेतमजुरांच्या घरातही आनंदाचा दिवा लागला पाहिजे. शासनाने शेतमजुरांच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने नव्हे, तर ठोस कृतीने पाहावे, हीच अपेक्षा. - राजाराम विठ्ठल पिंपळे (शेतमजूर, दरेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

IND vs NZ ODI Squad : निवड समितीच्या डोक्यात काय शिजतंय? जसप्रीत बुमराहचा वन डे संघात समावेश अनिश्चित, दुखापत की आणखी काही कारण? Inside Story

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, बैठकीनंतरही अंमलबजावणी केली नाहीय; पडळकरांचा शिंदेंच्या मंत्र्यावर निशाणा

Latest Marathi News Update : “साहेब, ५ हजार रुपयांत काय होणार? शेतकऱ्याचं दुःख एकदा बांधावर येऊन समजून घ्या!”; हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

SCROLL FOR NEXT