पान तीन मेन
-----------------
२७३१५
येवला : पाण्याअभावी लागवडीपूर्वी वाफ्यातच करपलेले उन्हाळ कांदा रोपे.
येवल्यात ६६ हजार शेतकऱ्यांच्या शिवाराला दुष्काळाची झळ
मका पिकाचे सर्वाधिक नुकसान; ६० कोटीची भरपाई अपेक्षित
संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २६ : यंदाच्या दुष्काळाने हक्काच्या खरीप हंगामाची वाताहात केली असून तालुक्यातील तब्बल ६८ हजार हेक्टर वरील पिके दुष्काळाने बाधित झाले आहे. त्यातच सुमारे ६६ हजार शेतकऱ्यांना या दुष्काळाची झळ बसल्याने गुंतवलेले भांडवलही मिळाले नसल्याची परिस्थिती आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार सुमारे ६० कोटींची भरपाई शासनाकडून मिळणार आहे. मात्र, झालेले नुकसान ५०० कोटीहून अधिक आहे.
खरिपातील मका, सोयाबीन आणि लाल कांदे हे येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. यावरच संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा असतो. पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातच रब्बी पिकतो. यंदा मात्र सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पेरणी झाली नंतर रिमझिम पावसावर पिके वाढली.
मात्र, ऑगस्टमध्ये पिकांची वाढ आणि फुलपत्ती, फळ लागण्याच्या अवस्थेत गरज असताना पाऊस झाला नाही. ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्यांनी पिकांना पाणी दिल्याने २५ ते ५० टक्के पिके वाचली. मात्र त्यातही उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. उत्तर पूर्व भागात तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात भुईमूग, मका, सोयाबीन या पिकांचा फक्त पाचोळाच उभा राहिला अन चाऱ्या पुरतीच पिके निघाली. अनेक शेतकऱ्याना गुंतवलेले भांडवलही मिळाले नसल्याची स्थिती आहे.
कांदा करपला
पोळ्यानंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवड होते. त्यासाठी पावसाळ्यानंतर लगेच रोपे टाकली जातात. पावसाच्या भरोशावर शेतकरी दरवर्षी लागवड करतात अन ती यशस्वीही होते.मात्र यावर्षी पाऊस नसताना पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आणि पावसाने दडी मारली. विहिरी,कुपनलिकांना पाणीच उतरले नाही.परिणामी लागवड केलेले कांदे सोडून देण्याची वेळ आली आहे. उन्हाळ कांद्याचे रोपे आणि कांदेही शेतातच करपून गेल्याची परिस्थिती आहे.
पंचनाम्यातून वास्तव समोर
महसूल व कृषी विभागाने पूर्ण तालुक्याचे नुकसानीचे पंचनामे केले आहे. तुरळक शेतकरी वगळता संपूर्ण तालुक्यातच शेतात वाळलेली, करपलेली पिके पथकांना दिसली. तालुक्यात खरिपाची ७५ हजार ५४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. याशिवाय कांदा, भाजीपाला व इतर फळ पिके सुमारे १० हजार हेक्टरवर घेतले असेल. सुमारे ८५ हेक्टर मधून तब्बल ६८ हजार हेक्टरवरची पिके बाधित झाली आहे.
महसूल विभागाने शासनाच्या सूचनेनुसार पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला आहे. तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडल्याने नुकसानीची तीव्रता जास्त आहे. मदतीच्या निकषानुसार सुमारे ५९ कोटी ६० लाख रुपयाये अनुदानाची मागणी केली आहे.
-पंकज नेवसे, नायब तहसीलदार, येवला
नुकसानीचे आकडे
एकूण बाधित गावे १२४
एकूण बाधित शेतकरी ६५७४३
एकूण बाधित क्षेत्र ६८२०१ हेक्टर
मदतीसाठी मागणी अनुदान ५९ कोटी ६० लक्ष
पिक व झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
मका ३८२५९
बाजरी ३३३८
सोयाबीन १९४६५
भुईमूग ७४९
कापूस ५२७
तूर ६८२
मूग ९६६
ज्वारी १.५०
कांदा २६०२
भाजीपाला ५१२
द्राक्ष ६६६
डाळींब २५२
अन्य फळपिके १७७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.