नाशिक

दुष्काळात कसूर करणाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई

CD
(पान १ ला मेन) ------------- फोटो क्रमांक : NSK26H31365 धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दुष्काळी आढावा बैठकीत बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. शेजारी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राम भदाणे, आमदार मंजुळा गावित, डॉ. सुभाष भामरे, भाग्यश्री विसपुते, बाबासाहेब बेलदार, डॉ. अजय देवरे आदी. -------------- दुष्काळात कसूर करणाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई मंत्री बावनकुळेंचा प्रशासनाला सज्जड दम, अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ४ : राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना आणि शेतकरी त्रस्त असताना प्रशासकीय अनास्था व भ्रष्टाचाराच्या तक्रारीबाबत महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण समिती उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळ निवारण उपायोजनांचा आढावा घेण्यात आला, ज्यातील उणीवांवर मंत्र्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. --------- बैठकीला पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार राम भदाणे, आमदार मंजुळा गावित, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी नागरिकांकडून दीडशेहून अधिक निवेदने मंत्री बावनकुळे यांना प्राप्त झाली. यात प्रामुख्याने भ्रष्टाचार, कामे प्रलंबित ठेवणे आणि नागरिकांना त्रास देण्याच्या तक्रारींचा पाढा होता. हे वाचून मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. - अवैध व्यवसाय बंद करा बैठकीला चहा- पाण्यासाठी आलेलो नाही, वर्षभरात तुम्हाला नेमकी किती पैशांची गरज आहे ते सांगा, पण लोकांचे जीव घेऊ नका, अशा शब्दांत मंत्री बावनकुळे यांनी ताकीद दिली. तसेच प्रशासकीय वचक नसल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात सुरू असलेले अवैध व्यवसाय, सट्टा, जुगार आणि अवैध वाळू वाहतूक तत्काळ बंद करण्याचे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले. समाज माध्यमातून देखील गैरकारभाराच्या तक्रारी येत असल्याचे सांगत त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. - ढिसाळ कारभारावर ताशेरे शेतकरी, कर्जमाफी आणि महावितरणच्या कारभारावर निर्देश देत मंत्री बावनकुळे म्हणाले की, तांत्रिक अडचणींमुळे जे सात हजार पात्र शेतकरी पीक कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत, त्यांच्या कागदपत्रांची तत्काळ पूर्तता करून त्यांना लाभ द्यावा. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी एकही फोन करू नये आणि ज्या बँकांनी पीक कर्ज वाटप केले नाही, त्यांच्या सरकारी खात्यांवर कारवाई करावी; तसेच एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. महावितरणच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढत जिल्ह्याला पुढील दहा वर्षे विजेची अखंड उपलब्धता होईल, असा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, दुष्काळात सिमेंट रस्त्यांचे कामे बंद करून जलसंधारणाचे कामांवर आणि शेत रस्ते तयार करण्यासाठी वापरावेत, आणि पुढच्या तीन वर्षांत एकही शेत रस्ता प्रलंबित राहिला कामा नये अशी ताकीद दिली. प्रशासनाने केवळ आकडेवारी न दाखवता प्रत्यक्षात शेवटच्या घटकापर्यंत शासनाचे योजनांचे लाभ पोहोचवून लोकांना दिलासा द्यावा. जर पुढच्या आढावा बैठकीत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. - १४-१ ..चौकट.. १४-१ मुख्यालयी राहण्याचे निर्देश बैठकीत दुष्काळ निवारणाशी संबंधित सर्व अकरा विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपले मुख्यालय न सोडता कार्यक्षेत्रातच राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही विनाकारण रजेवर जाऊ नये आणि विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आगामी काळात कोणत्याही तालुक्यात किंवा गावात अचानक भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT