नाशिक

उन्हाळ कांद्यासह गहु, हरभरा,ज्वारीत ४० टक्के घट

CD
पान तीन (क्लिपआर्ट वापरावे) ------------- सावट दुष्काळाचे ------------------ रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात ४० टक्के घटीची शक्यता उन्हाळ कांद्यासह गहू, हरभरा व ज्वारीला फटका; शेतकरी संकटात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : ‘एल निनो’चा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पिकांच्या उत्पादनात सरासरी ४० टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः उन्हाळ कांदे, गहु, हरभरा व रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही घट दिसून येते. जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुके आतापर्यंत दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात खरिपाची पिके हाती आली. मात्र, त्यानंतर पावसाने तब्बल २१ दिवसांपेक्षा जास्त काळ दडी मारल्याने उभी पिके शेतातच करपली. मका, सोयाबीन आणि कापूस ही पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ पालापाचोळा आला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार रब्बी हंगामात तब्बल ४० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. आगामी काळात परतीच्या पावसाने हजेरी न लावल्यास ही घट अधिक वाढून रब्बीची पेरणी आणखी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ------ पिके जगविण्याचे आवाहन जिल्ह्यात २८३ गावांमध्ये रब्बीचे सुमारे १.११ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये मका, ज्वारी, गहू, हरभरा व उन्हाळ कांदा या पिकांचा समावेश होतो. या पिकांव्यतिरिक्त फळबागा व बागायती पिके जगवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर असून, त्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना कराव्या लागणार आहेत. गेल्या १० वर्षांत पावसाचा लहरीपणा गेल्या दहा वर्षांतील आकडेवारी पाहता पावसाच्या प्रमाणात सातत्याने मोठे बदल झाले आहेत. २०१५ हे वर्ष वगळता जिल्ह्यात नेहमीच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट होते. कमी कालावधीत जास्त पाऊस पडत असल्याने कागदावर सरासरी गाठली जात असली, तरी प्रत्यक्षात शेती पिकांना त्याचा काहीही फायदा होत नाही. वर्षनिहाय कमी पाऊस २०१८ : ५७० मिली मिटर पाऊस (३९ टक्के कमी) २०१५ : ४८४ मिली मिटर पाऊस (४८ टक्के कमी) २०२३ : ६४२ मिली मिटर पाऊस (३१ टक्के कमी) रब्बी पीकनिहाय सरासरी क्षेत्र (हेक्टर) ज्वारी ६१५० गहू ६३३६५ मका १०१२५ हरभरा ३२१४० कांदा २.२५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT