नाशिक

दुष्काळग्रस्तांना दोन लाखांपर्यंत मदतीची मागणी

CD
SKD26B04328 धुळे : महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करताना शिवसेना ठाकरे पक्षाचे शानाभाऊ सोनवणे व पदाधिकारी. ------- दुष्काळग्रस्तांना दोन लाखांपर्यंत मदत द्या शिवसेनेचे (उबाठा) महसूलमंत्री बावनकुळे यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. ५ : धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शिवसेना धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी बावनकुळे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे पंचनाम्यांच्या प्रक्रियेत विलंब न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट किमान एक लाख ते कमाल दोन लाख रुपयांपर्यंत विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली. धुळे जिल्ह्याला प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, तसेच धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्याचा पोखरा योजनेत समावेश करून कृषी, जलसंधारण व सिंचनासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. दुष्काळामुळे शेतीतील रोजगार कमी झाल्याने रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत. शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा देऊन भीतीचे वातावरण निर्माण करू नये, तसेच खासगी शाळांनी दुष्काळी परिस्थितीत पालकांकडे शुल्कवसुलीसाठी अनावश्यक तगादा लावू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची मागणीही करण्यात आली. या वेळी उपजिल्हाप्रमुख छोटू पाटील, उपजिल्हा समन्वयक मनोज पवार, आधार बोरसे, राजेंद्र पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT