नाशिक

दुष्काळी मदत मिळण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांचा एल्गार

CD
फोटो : NSK26H31462 धडगाव : तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभागी शेतकरी. (छायाचित्र : सागर निकवाडे) ------------ दुष्काळी मदतीसाठी आदिवासी शेतकऱ्यांचा एल्गार विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ५ : दुष्काळी मदत मिळण्यासाठी धडगाव येथे अखिल भारतीय सरपंच परिषद आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे धडगाव येथे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. प्रलंबित फार्मर आयडी, वनहक्क दावे, दुष्काळी मदत आणि घरकुलसाठी वाळू मिळावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. येत्या १५ दिवसांत मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. यापूर्वी ३० जुलैला याच मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धडगाव तहसीलदारांना निवेदन पाठवण्यात आले. प्रलंबित फार्मर आयडी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, वनहक्क दावे निकाली काढावेत, पट्ट्यांमध्ये दुरुस्ती करावी, नवीन वनहक्क दाव्यांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे, वनपट्टा न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही दुष्काळी नुकसान भरपाई द्यावी, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत. घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी, वनजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर सरकारी फॉरेस्टची नोंद रद्द करून मूळ शेतकऱ्यांचे नाव लावावे, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहे. मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. ------ धडगाव तालुक्यातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही हा लढा उभा केला आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फार्मर आयडी आणि वनहक्क पट्ट्यांअभावी शेतकरी शासकीय योजना व दुष्काळी मदतीपासून वंचित आहेत. - ॲड. वसंत वळवी, अध्यक्ष, अक्राणी तालुका सरपंच परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT