नाशिक

सत्यशोधक सभेचा आज मोर्चा

CD
दुष्काळ निवारणसह वनहक्कासाठी आज मोर्चा -- शेतकरी, आदिवासींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक सभेचा एल्गार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे पिके जळून खाक झाली असून, शेतकरी व आदिवासी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारण, मतदारयादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेचा विरोध आणि आदिवासी वनहक्क कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशोधक महिला सभा, सत्यशोधक शेतकरी सभा (महाराष्ट्र) आणि किसान महासभा, संयुक्त किसान मोर्चा (दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २३) दुपारी बाराला साक्री (जि. धुळे), नवापूर (जि. नंदुरबार), कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर), सटाणा (जि. नाशिक) येथील तहसील कार्यालय, तर नंदुरबार व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे किशोर ढमाले यांनी दिली. ऑगस्टनंतर पाऊस न झाल्याने सोयाबीन, भात, कापूस व तूर जळाली आहे. शासनाने ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून पाच हजारांची मदत देण्यापलीकडे ठोस उपाययोजना केलेली नाही. प्रशासनाने वेळकाढू पंचनाम्यांऐवजी सरसकट सर्व शेतकऱ्यांना आणि २०२० पूर्वीच्या वनहक्क दावेदारांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. भूमिहीन शेतमजूर व कष्टकऱ्यांना पुढील वर्षभर दरमहा पाच हजार रुपये जीवन अनुदान द्यावे, अशी प्रमुख मागणी आहे. या मोर्चात हजारो शेतकरी व कष्टकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

Parner News : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या पारनेर जागेसाठी नीलेश लंके विरुद्ध राहुल शिंदे; थेट लढत निश्चित

M.Pharmacy Admission : एम. फार्मसीच्या चौथ्या फेरीत चार हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; २४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

CJP Leaders Bail Update : सौरव दास, आशुतोष रांका यांची तुरुंगातून सुटका; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात CJP पुन्हा आक्रमक

Water Supply Scheme Issue : रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांवरून जिल्हा परिषदेत वाद; आठवडाभरात अहवाल देण्याचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT