नाशिक

चित्र दुष्काळाचे/यावल तालुका

CD
मेनफिचर टुडे पान चारसाठी ------------------ (सूचना : मजकुरात आणखीन दोन चौकटी येणार आहेत.) ------------------------------ लोगो : चित्र दुष्काळाचे/यावल तालुका ---------------------------------- DIH26A02012 यावल : पावसाअभावी वाया गेलेले कापसाचे पीक. ------------- DIH26A02011(रिंगुबाई बारेला शेतकरी) DIH26A02010 (पंकज बडगुजर, शेतकरी) ------------ शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक मदतीची गरज ------ यावल तालुक्यात बिकटस्थिती; प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने दखल घ्यावी जीवन चौधरी : सकाळ वृत्तसेवा यावल, ता. ३ : यावल तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाअभावी मोठे संकट ओढवले असून, आजपर्यंत तालुक्यात केवळ ४४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची नोंद सुमारे ६५० ते ७०० मिलिमीटरच्या दरम्यान आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. मध्यंतरी झालेल्या तीन दिवसांच्या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी त्याचा पिकांना फारसा फायदा झालेला नाही. म्हणून याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे. यावल तालुक्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाले असून, त्यातून उत्पादन मिळण्याची शक्यता अत्यल्प आहे. कापसाचेही अपेक्षित उत्पादन होणार नसून, दोन वेचण्यांनंतरच पीक संपण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यात कापसाला व्यापाऱ्यांकडून सुमारे ८ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळत असल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीतही सातत्याने घट होत आहे. त्याचा परिणाम आगामी रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे. सध्या कांदा लागवड सुरू असली तरी गतवर्षीच्या तुलनेत क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे. महसूल विभागाच्या माहितीनुसार, सध्या तालुक्यातील कोणत्याही गावात पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. केळी, मक्यालाही दराचा फटका दुष्काळी परिस्थितीचा फटका केळी व मक्यालाही बसला आहे. केळीला व्यापाऱ्यांकडून केवळ ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा कापून टाकल्या आहेत. शेतात पडलेल्या केळीचा वापर गुरांसाठी चारा म्हणून केला जात आहे. मक्यालाही सुमारे १,८०० रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पंचनाम्याची प्रक्रिया सुरू बिकटपरिस्थितीची दखल घेत महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरासाठी तीन कर्मचारी, मोठ्या गावांसाठी दोन व लहान गावांसाठी एक कर्मचारी अशा पद्धतीने तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचनाम्याचे काम वेगाने सुरू असल्याचे तहसीलदार मोहनमाला नागझिरकर यांनी सांगितले. रोजगारावरही परिणामाची शक्यता खरीप हंगामातील नुकसान व रब्बी हंगामावर होणारा संभाव्य परिणाम यामुळे ग्रामीण भागातील रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतातील कामे कमी झाल्याने मजुरांच्या रोजगारावर परिणाम होणार असून, त्याचा फटका स्थानिक व्यवसायांनाही बसण्याची शक्यता आहे. ------- चौकट पशुधनाची संख्या पशुधनाचा प्रकार - संख्या गायी : २८ हजार ४४५ म्हशी : १८ हजार ९७१ शेळ्या : २८ हजार मेंढ्या : १ हजार ३९ कोंबड्या : १२ हजार ४५१ एकूण : ८९ हजार २६० ------------------- चौकट तालुक्यातील पर्जन्यमान यावल तालुक्यात गेल्यावर्षी सप्टेंबरअखेर पर्जन्यमान ४४५.१८ एवढं झालं होतं. जून महिन्यात ५७.१, जुलै १५३.३३, आगस्ट १४२.४२ व सप्टेंबरअखेर १३२.४३. यावर्षी ५३ एवढे एकूण झाले होते. एकूण पावसाळ्यात ५७०.३० एवढा सप्टेंबरपर्यंत झाले होते. यावर्षी मात्र, जून महिन्यात ३५.३, जुलै ६२.६०. ऑगस्टमध्ये १६९.८५ व सप्टेंबरमध्ये ४३.८२ असा एकूण ४४२.३ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. आजपर्यंत एकूण पावसाळा ४५७. ८० मिलिमीटर पाहिजे होता. -------- DIH26A02010 (पंकज बडगुजर) माझ्या शेतात सोयाबीन व कापूस लागवड केली होती. मात्र, संपूर्ण सोयाबीन जमीनदोस्त झाले असून, त्यातून उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. कापूसही दोन वेचण्यांतच संपेल. वाढते बियाणे व खतांचे दर यामुळे कर्जबाजारी झालो आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदतीचा हात पुढे करावा. -पंकज जीवन बडगुजर, शेतकरी, सावखेडा सीम (ता.यावल) ----- कोट DIH26A02011(रिंगुबाई किसन बारेला) माझ्याकडे सहा एकर शेतजमीन आहे. मागील वर्षी ५० क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले होते. यावर्षी मात्र, हातात काहीच येणार नाही. निसर्गाने मोठा अपेक्षाभंग केला असून, शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी. -किस रिंगुबाई किसन बारेला, शेतकरी, लसूणबर्डी (ता.यावल). ---------

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update : पोटच्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; ३५ वर्षीय वडिलांना अटक

Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

SCROLL FOR NEXT