नाशिक

भाजप किसान मोर्चाचे निवेदन

CD
(बातमी आजच घ्यावी) NSK26H30999 जळगाव : जिल्‍हाधिकारी रोहन घुगे यांना शेतकऱ्यांच्‍या विविध प्रश्‍नांबाबत निवेदन देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मोरे व पदाधिकारी. ------------- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या --- पीकविमा रकमेचीही मागणी; भाजप किसान मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत देण्यात यावी, यांसह विविध मागण्यांचे निवेदन भाजप किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, जिजाबराव पाटील, रत्नाकर पाटील, बापुराव पाटील, उपाध्यक्ष कमलाकर रोटे, मनोहर पाटील, सच्चिदानंद चव्हाण, किशोर नारखेडे यांच्यासह किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रलंबित पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, शासकीय ज्वारी खरेदी केंद्रांना मुदतवाढ देऊन शिल्लक ज्वारीची खरेदी पूर्ण करावी. रब्बी हंगामासाठी वाघूर व गिरणा धरणांतून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. चौकट पीकपेरा नोंदणीतील अडचणी दूर करा ई-पीक पाहणीत तलाठ्यांकडून पीकपेरा मंजूर होऊनही पोर्टलवर मंजुरी दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. पीकपेरा नोंदविताना लॉगिन प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराण्याची मागणीही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT