KPD26B13437
कापडणे : डाॅ. भानुदास पाटील व मंगलाबाई पाटील यांचा सन्मान करतांना आमदार राम भदाणे. शेजारी प्रा. शरद पाटील आदी.
-----------
दुष्काळी उपाययोजनांची
अंमलबजावणी करा
शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ६ : धुळे जिल्हा हा अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्याने नेहमीच पाणी व चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यावर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, पावसाच्या दीर्घ खंडामुळे आणि असमान वितरणामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. शासनाने धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केल्याबद्दल आभारी आहोत. आता दुष्काळ निवारण उपाययोजनांची प्रभावी व तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळ जाहीर केल्यानंतर शासकीय निकषानुसार महसुलातील सूट, कर्जवसुली स्थगिती, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ यांची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी, नाला खोलीकरण, गाळ काढणे, शेततळे व गावतळ्यांची निर्मिती प्राधान्याने हाती घ्यावी. धुळे जिल्हा पोकरा (नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी) योजनेत समाविष्ट नाही. तो तत्काळ समाविष्ट करून ठिबक, तुषार, रेन गन ९० टक्के अनुदानावर द्यावेत, जेणेकरून रब्बी हंगामात पाण्याचा कार्यक्षम वापर होईल. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेत रस्ता योजना रोहयो कामात समाविष्ट केल्यास शेतमालाची ने- आण सुलभ होईल. शासनाकडून मिळणारी दुष्काळी मदत एकरी ५० हजार तत्काळ द्यावी. त्यातील २५ हजार खरीप हंगामातील भांडवली खर्चाचे परिमार्जन म्हणून व २५ हजार रब्बी हंगामात पेरणीसाठी द्यावे. ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ दहा हजार निविष्ठा खरेदीसाठी द्यावेत. खरीप हंगामातील कर्जवसुली पूर्णपणे थांबवून कृषी अवजारे व इतर कर्जाचाही समावेश करावा व पीक विम्याची रक्कम तत्काळ खात्यात जमा करावी, चारा व पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी आदी मागण्यात करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.