नाशिक

चित्र दुष्काळाचे : त्र्यंबकेश्‍वर

CD
चित्र दुष्काळाचे : त्र्यंबकेश्‍वर (फोटो :31488/31489) … दुष्काळाच्या मदतीपासून रोजगाराच्या संधींपर्यंत ठोस कृतीची गरज ----------------------------------------------------- चारा छावण्या, सिंचनासाठी वीज आणि धरणातील पाणी वापरण्याची परवानगी मिळावी किरण कवडे, सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : दुष्काळाच्या झळांनी त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शेती आणि पशुधन अडचणीत आले असताना शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई, गुरांसाठी चारा छावण्या, सिंचनासाठी अखंडित वीज आणि धरणातील पाणी वापरण्याची परवानगी देण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या संधींचा विस्तार करून रोप वे, ट्रेकिंग, रिंगरोड व बाह्यवळण रस्त्यांसारख्या सुविधांतून तालुक्याच्या विकासाला आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्र्यंबकेश्‍वरला काश्‍यपी, गंगापूर (धरण नाशिक तालुक्यात असले तरी बहुतांश साठा हा त्र्यंबकेश्‍वरमधून होतो), बेझे, वाघेरा, किकवी आदी प्रमुख धरणे आहेत. या धरणांमधे मुबलक साठा दिसत असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस झालेला नाही. परिणामी, शेतात उभी असणारी पिके आता पिवळी पडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी हिरवागार दिसणारा इंद्रायणी, १००८ इ. भाताची पिके करपत असल्याचे दिसते. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अखंडित वीज पुरवठ्याचा अभाव बागायती क्षेत्रालाही पाण्याची गरज भासत असल्याने विहिरीमधील पाण्यावर ही पिके जगवली जातात. पण वीजपुरवठा सातत्याने खंडित होतो. सलग आठ तासही वीज मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. धरणांमधील पाणी स्थानिकांना वापरासाठी दिले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष न लावता सरसकट मदत केल्यास शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा फायदा होईल; अन्यथा, नियम व निकषांमध्ये शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम हातात पडेल. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शासकीय मदत करताना क्षेत्राचा विचार व्हायला हवा, अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी वर्तविली. पर्यटनाला चालना द्यावी त्र्यंबकेश्‍वरमध्ये धार्मिक पर्यटनाला अधिक वाव असल्यामुळे येथील पर्यटनाला चालना देण्याची मागणी स्थानिकांनी केली. धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून हॉटेल, टेंट सिटी, ट्रेकिंग यांसारख्या पर्यटनातून त्र्यंबकेश्‍वरच्या स्थानिक रहिवाशांना कायमस्वरूपी रोजगार निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पीक कापणी प्रयोगाचा आधार दुष्काळी तालुक्यांमधे त्र्यंबकेश्वरचा समावेश न झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. लोकप्रतिनिधींनी शासनाकडे विनंती करत दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्याचा आग्रह धरला. अखेर त्यांची विनंती मान्य करत शासनाने येथील प्रमुख पीक कापणी प्रयोगाचा अहवाल मागवून त्यानुसार मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे काय मदत मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. … धरण....पाणीसाठा (दलघमी).......उपयुक्त साठा काश्‍यपी....१८५२..................१८५२ (१००टक्के) गंगापूर......५५३२ ….............५५३० (९८.२६टक्के) गौतमी गोदावरी....१८६८.........१८६८ (१००टक्के) …. तालुक्यातील पशुधन गायवर्ग-४२६४० म्हैस-१०१२७ मेंढ्या-५४२ शेळ्या-१६७८१ एकूण-७०, ०९० …. महिना........अपेक्षित पाऊस.......... प्रत्यक्ष पाऊस...... टक्केवारी जून ते सप्टेंबर.....२१६६.१ मिलीमिटर....२४३० मिली मिटर.....१११.८ टक्के …. कोट... तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेती एक ते दोन एकरच्या आतील आहेत. त्यांना मदत करताना शासनाने काही नियम आणि निकष लावले तर काहीच मदत मिळणार नाही. सरसकट मदत केली पाहिजे. धरणातील काही पाणी स्थानिकांना मिळायला हवे. - दिलीप खाकळे, त्र्यंबकेश्‍वर (31490) … राज्य शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे. शेतमालाला भाव नाही. दोन महिने झाले पाऊस पडलेला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे, त्यामुळे शासनाने भरघोस मदत केली पाहिजे. - अलका महाले, वाढोली () … त्र्यंबकेश्‍वरकरांच्या अपेक्षा - दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत त्र्यंबकेश्‍वरचा समावेश करा - शेतकऱ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई द्या, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे त्र्यंबकेश्वरचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार भरपाईची रक्कम त्वरित मिळाली पाहिजे. - शेतकऱ्यांना मदत देताना निकष लावले तर एक ते दोन एकरच्या आतील शेतकऱ्यांना फारशी मदत मिळणार नाही. शासन सर्वत्र एकसारखे नियम लागू करते. पण शासनाने भौगोलिक परिस्थिती व शेतकऱ्यांच्या जमिनीचा विचार करायला हवा. - छावण्या सुरू करून गुरांना चारा उपलब्ध करून द्यावा. - धरणातील पाणी स्थानिकांना उचलण्याची परवानगी हवी. त्यांनी धरणासाठी जमीन दिली. त्यांच्या भावनांचा अनादर करून प्रशासनाने शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेऊ नये. - वीज पुरवठा सलग ८ तास सुरळीतपणे हवा. सिंगल फेज वीज पुरवठा करताना एक ते दोन तास कमी जास्त कालावधी झाला तरी चालतो. पण पाणी उपसा करण्यासाठी वीज मोटारीला सलग ८ तास अखंडित पुरवठा केला पाहिजे. - भात, बागायती शेतमालास हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाची खात्री वाटेल. - पर्यटन वृद्धीसाठी शासनाने सचोटीने प्रयत्न करायला हवे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पर्यटनासाठी खूप संधी आहेत. शहरात दररोज २५ हजार भाविक दर्शनासाठी येतात. त्यांचा विचार केला तर येथे पर्यटनाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतील. - कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्‍वर तालुक्याचा कायापालट व्हावा ही स्थानिकांची अपेक्षा आहे. रोप वे, ट्रेकिंग, रिंगरोड, बाह्यवळण रस्ता आदी सुविधा निर्माण झाल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल. याशिवाय स्थानिकांना रोजगाराचे नवीन साधन तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT