नाशिक

मनविसेचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन

CD
३३६१८ नाशिक : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याच्या मागणीसाठी प्रभारी उपसंचालक देवकर यांना निवेदन देताना नितीन धानापुणे, ललित वाघ, तुषार जगताप आदी. ----------- दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी सरसकट माफ करावी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा फी कोणतीही अट न घालता सरसकट माफ करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. याबाबत निवेदन शिक्षण विभागाचे प्रभारी उपसंचालक श्री. देवकर यांना देण्यात आले. राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्यात परीक्षा शुल्क माफीचा निर्णयही समाविष्ट आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत इतर शिष्यवृत्ती किंवा सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या माफीचा लाभ नाकारला जात असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. शासन बोलते फी माफ आहे आणि दुसरीकडे शाळा-महाविद्यालये विद्यार्थ्यांची अडवणूक करत आहेत, असा आरोप मनविसेने केला. निकषांमधील अस्पष्टता, शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आणि सवलतीचा मूळ उद्देश बाजूला राहत असल्याचे मुद्दे मनविसेने मांडले आहेत. दुष्काळात शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार देणे हा उद्देश असताना अस्पष्ट मार्गदर्शक सूचनांमुळे गरजू विद्यार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करून दुष्काळी तालुक्यांतील सर्व बाधित विद्यार्थ्यांना इतर शिष्यवृत्ती मिळत असली तरी परीक्षा शुल्क माफी मिळावी, असे सुधारित स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांसाठी पत्र काढण्याचे आश्वासन देवकर यांनी दिले. या प्रसंगी मनविसेचे राज्य कार्यकारणी सदस्य नितीन धानापुणे, जिल्हाध्यक्ष ललित वाघ, शहराध्यक्ष तुषार जगताप, शहर कार्यकारिणी सदस्य नीरज भालेराव, नाशिक रोड विभाग अध्यक्ष प्रसाद घुमरे, विभाग सचिव दीपक यलमामे, प्रसाद सोनवणे, जय खैरनार, संदीप आहेर, दीपक बोराडे आदी उपस्थित होते. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर निवडणूक; अभिजित वंजारी आघाडीवर

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT