( टुडे पान एकला सेकंड मेन)
फोटो : NSK26H33845
नंदुरबार : तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. शेजारी डॉ. मिताली सेठी, नमन गोयल, बंडू कापसे, संतोष डेरे.
-----------------------
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्नशील
पालकमंत्री हसन मुश्रीफ : दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २९ : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडले आहेत. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी नंदुरबार तालुक्यातील पिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्य:स्थिती, नुकसानीची व्याप्ती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी बंडू कापसे, तहसीलदार संतोष ढेरे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यात कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न
करण्यात येतील. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी असून, त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. येत्या एक- दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी या वेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.