नाशिक

पाच तालुक्यांचा प्रस्ताव सरकारदरबारी

CD
पान तीन -------------------- पाच तालुक्यांचा प्रस्ताव सरकार दरबारी दुष्काळाचे संकट : प्रशासनातर्फे २५ टक्के पंचनामे पूर्ण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पीक पंचनाम्यांना गती देण्यात आली असून आतापर्यंत साधारणतः २५ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचवेळी नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, निफाड आणि चांदवड या तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेशासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात यंदा मॉन्सूनने पाठ फिरवली आहे. साधारणतः ३० टक्के पर्जन्य तुटीची नोंद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगाम करपला असून त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने पंधरापैकी दहा तालुक्यात ट्रिगर-१’ जाहीर करताना दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पीक पंचनाम्यांची कामे हाती घेतली आहे. महसूल, कृषी तसेच ग्रामसेवक हे बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण करत आहेत. दुष्काळग्रस्त दहा तालुक्यातील पंचनामे वेगाने केले जात आहेत. आतापर्यंत पंचनाम्यांचे अंदाजे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांमध्ये येत्या १५ तारखेपर्यंत पंचनाम्यांची कामे संपविण्याचे उदिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. त्यादृष्टीने तालुकास्तरावरील यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एकीकडे पंचनाम्यांना वेग आला असताना दुष्काळ यादीत समावेश होऊ न शकलेल्या पाच तालुक्यांचाही प्रशासनातर्फे फेरआढावा घेतला. स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेता संबंधित तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेशासंदर्भात प्रशासनाने सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. सरकार आता या प्रस्तावावर काय निर्णय घेते याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. --- २९०० पीक कापणी प्रयोग दुष्काळाची भीषणता लक्षात घेता शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे सरकारकडून आश्‍वासन दिले जात आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात पीक पंचनाम्यांची कामे प्रशासनाने प्राधान्याने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात १५० प्रकारच्या प्लॉटवर २ हजार ९०० पीक कापणीचे प्रयोग राबविण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT