नाशिक

कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे

CD
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे पिंपळगाव बसवंत पोलिसांकडून जनजागृती; दुचाकी, जनावरे, घरफोडीच्या घटनांबाबत सूचना सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. ९ ः कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता पिंपळगाव बसवंत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुचाकी चोरी, जनावरांची चोरी, घरफोडी तसेच संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींबाबत नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी जनजागृती संदेशातून स्पष्ट केले आहे. दुचाकी नेहमी सुरक्षित ठिकाणी पार्क करून हँडल लॉक करण्यासह अतिरिक्त लॉकचा वापर करावा. जनावरे रात्री सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच गोठ्याच्या परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवावी. घर बंद करून बाहेर जाताना दरवाजे-खिडक्या व्यवस्थित बंद करून कुलूप लावावे आणि शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी. गावात किंवा परिसरात अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. तसेच ग्रामसुरक्षा समिती, पोलीस पाटील व स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे गावात गस्त व जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘आपली सतर्कता- आपला गाव सुरक्षित’ हा संदेश देत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी नागरिकांना सामूहिक सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद घटना अथवा हालचाल आढळल्यास तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या आश्रमशाळा कर्मचाऱ्याचा वनविभागाच्या गार्डनमध्ये गळफास घेतलेला मृतदेह आढळला

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT