lalit patil Esakal
नाशिक

Lalit Patil Drug Case: ड्रग्स माफिया ललित पाटीलचा नाशिक पोलिस ताबा घेणार

सकाळ वृतसेवा

Lalit Patil Drug Case : अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील संशयित अक्षय नाईकवाडेला भोपाळमधून अटक केल्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य संशयित ललित पाटील याचा नाशिक पोलिस ताबा घेणार आहेत.

त्यामुळे या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. (Drugs mafia Lalit Patil will take over Nashik police news)

अमली पदार्थ विरोधी पथकाने शिंदे गावातील श्री गणेशाय इंडस्ट्रीजवर छापे टाकत येथून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केला. दोन महिन्यांत या गुन्ह्याची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढली आणि चौदापेक्षा अधिक संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुख्य संशयित म्हणून ललित पाटील याचे नाव घेतले जाते.

२ नोव्हेंबरला पुणे पोलिसांचे पथक ललित घेऊन नाशिकला येऊन गेले. त्यानंतर ललितकडून पोलिसांनी पाच किलो सोने जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस अधिक तपासासाठी ललितला नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत. शुक्रवारी (८) मध्यरात्री तो नाशिक पोलिसांच्या ताब्यात मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

ललितचे साथीदार...

पोलिसांनी ललितसह सुभाष मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी, अरविंदकुमार लोहरे, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित यांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे.

संशयितांकडून दोन कोटी १४ लाख ३० हजार रुपयांचे मेफेड्रान जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्रीतून संशयितांनी खरेदी केलेली आठ किलो सोन्याची बिस्किटे, महागड्या मोटारी, मोबाईल असा पाच कोटी ११ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT