Drugs esakal
नाशिक

Nashik Crime: वडाळा गावात लाखोंचे ड्रग्ज हस्तगत; एका महिलेला घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : वडाळा गाव परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक व युनिट दोनच्या पथकाने कारवाई करून लाखो रुपयाचे ड्रग्ज हस्तगत केले आहेत.

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (ता.५) सकाळपासून सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईत एका महिलेकडून ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. (Drugs worth lakhs seized in Wadala village woman taken into custody Nashik Crime)

रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी तपासणी, पडताळणी व चौकशी सुरू होती. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक व युनिट दोनच्या पथकाने शहरातील ड्रग पेडलर महिलेला वडाळ्यातील एका बंगल्यातून मुद्देमालासह अटक केल्याचे समजते.

कारवाईत ५१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन ड्रग), दीड किलो गांजा तसेच काही प्रमाणात चरस देखील जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नाशिक शहराचा होणारा उडता पंजाब होतोय की काय असे समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT