मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
वाहतूक शाखेची कारवाई; दहा महिन्यात ३३६ जणांवर गुन्हे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : रस्ते अपघात, तसेच त्यामध्ये होणारी जीवितहानी आणि अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाकडून वाहनचालक तळीरामांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. दहा महिन्यात सुमारे दीड हजार केसेस करीत ऑक्टोबर महिन्यात १२६ मद्यपी चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त चंद्रकांत गवळी, शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ७ महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतर्गत ७ ‘क्रिटिकल कॉरिडॉर’ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके शहरात सातत्याने कार्यरत असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध एकूण १६१५ केसेस करण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष मोहीम राबवून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. २०२५ या गेल्या वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबरअखेर मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईत थेट २३५ ने संख्या वाढली असून, ऑक्टोबर महिन्यात १२६ मद्यपी वाहनचालकांवर रंगेहाथ कारवाई केली आहे.
---
कारवाईची तुलनात्मक आकडेवारी:
कालावधी........... कारवाईची आकडेवारी
- २०२५ (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर) ............... ११५
- ऑक्टोबर २०२६ ............. १२६
- १ जानेवारी २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ ................ १०१
- १ जानेवारी २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ .................. ३३६
- ड्रंक-ड्राईव्ह कारवाई वाढ / घट ...................२३५ ने वाढ
--कोट
फोटो : H33511
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही विशेष मोहीम यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये.
- माधव रेड्डी, सहायक आयुक्त, शहर वाहतूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.