Nashik esakal
नाशिक

नाशिक : मद्यपी तरुणाने पोलिस चौकी गाठली अन् पोलिसांची झोपच उडाली

युनूस शेख

जुने नाशिक : मद्यपीने नशेत सराफ बाजारातील सरकारवाडा पोलिस ठाण्याची चौकी गाठली आणि पोलिसांची झोपच उडाली. मद्यपीने चौकी आवारातील पिंपळाच्या झाडावर चढून टोक गाठले. आत्ता खाली पडेल तेव्हा खाली पडेल भीतीने पोलिसांनी अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. दीड तासाच्या प्रयत्नानंतर त्यास खाली उतरविण्यात यश आले.

मद्यपी तरुणाचा उच्च दाबाच्या तारेला हात लावण्याचा प्रयत्न

मद्यपी तरुण सोमवारी (ता.७) रात्री सराफ बाजारातील सरकारवाडा अंकित पोलिस चौकी आवारात शिरला. पोलिसांची नजर चुकवत आवारातील पिंपळाच्या झाडावर चढून बसला. पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्यांना दाद दिली नाही. दरम्यान, हळूहळू वर चढत उच्च दाबाच्या तारेस हात लावण्याचा प्रयत्न केला. नशेच्या आहारी आहे. तो केव्हाही खाली पडून दुर्घटना घडू शकते या भीतीने पोलिसांनी अग्निशामक विभागास माहिती दिली. लोडिंग फायरमन श्याम राऊत, राजू नाकील, दिनू लासुरे, भीमाशंकर खोडे, नाजीम देशमुख, नाना गांगुर्डे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मद्यपी उच्च दाबाच्या तारेस हात लावत असल्याने दुर्घटना होऊ नये यासाठी पोलिस आणि अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वीज वितरण विभागास माहिती देत परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर त्यास उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. झाडावर चढून त्यास खाली उतरवणे शक्य नव्हते. त्यांना पाहून तो खाली उडी मारण्याची शक्यता होती. कर्मचाऱ्यांनी त्यास बांबू टोचत हळूहळू खाली उतरण्याचा प्रयत्न केला, तर काही कर्मचाऱ्यांनी खाली नायलॉन जाळी धरून ठेवली. त्याने काही वेळानंतर उडी मारली. परंतु कर्मचारी जाळी धरून ठेवली असल्याने दुर्घटना टळली.

तब्बल दीड तासानंतर मद्यपीला खाली उतरण्यात यश आले. यामुळे पोलिस आणि अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दुसरीकडे वीजपुरवठा खंडित झाल्याने कारण नसताना परिसरातील नागरिकांना अंधाराच्या काळोखात राहण्याची वेळ आली. रात्रीची वेळ वीजपुरवठा खंडित यामुळे अग्निशामक विभागास मद्यपीला खाली उतरवण्यास मोठ्या अडचणीस सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT