Marriage Sakal
नाशिक

कोरोनामुळे विवाह सोहळ्यांना ब्रेक! मे महिन्यात अवघी एक नोंदणी

युनूस शेख

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी विवाह सोहळ्यांसह अन्य सोहळ्यावर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती. त्याचा परिणाम विवाह नोंदीवरदेखील झाला आहे.

जुने नाशिक : कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी विवाह सोहळ्यांसह अन्य सोहळ्यावर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती. त्याचा परिणाम विवाह नोंदीवरदेखील झाला आहे. पूर्व विभागीय कार्यालयात गेल्या पाच महिन्यात केवळ ११३, तर मे महिन्यात अवघी १ विवाह नोंदणी झाली आहे. (due to coronavirus only one marriage was registered in may)

पासपोर्ट बनविण्यापासून तर मुलांच्या शैक्षणिक कामासाठी सध्या आधार कार्डसह पालकांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. त्यामुळे प्रत्येकाकडून विवाह नोंदणी करून घेण्याकडे कल असतो. सध्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने विवाह नोंदणीस ब्रेक लागला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गर्दीने कोरोना संसर्ग वाढतो. तो टाळण्यासाठी प्रशासनाकडून विवाह सोहळ्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे विवाह सोहळे होऊ शकले नाही. तर काही ठिकाणी पाच ते दहा जणांच्या उपस्थित सोहळे झाले. परंतु त्यांच्याकडून विवाह नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष केले, तर काहींना लॉकडाऊनमुळे नोंदणीसाठी कार्यालयात जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे महापालिका विभागीय कार्यालयांमध्ये गेल्या पाच महिन्यात अवघ्या काही प्रमाणात विवाह नोंदणी झाली. पूर्व विभागीय कार्यालयातील विवाह नोंदणी विभागाचा विचार केला, तर गेल्या पाच महिन्यात अवघे ११३ विवाह नोंदणी झाली. चालू मे महिन्यात केवळ एक नोंदणी झाली आहे. १ जूननंतर लॉकडाउन उघडून सर्व सोहळ्याना सुरवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास जून महिन्यामध्ये विवाह नोंदणी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

महिनानिहाय नोंदणी

महिना नोंदणी

जानेवारी ३०

फेब्रुवारी ३७

मार्च ३१

एप्रिल १४

मे ०१

(due to coronavirus only one marriage was registered in may)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT