Highway over mill bridge lost in fog. esakal
नाशिक

Nashik News : धुक्यामुळे महामार्ग वाहतुकीवर परिणाम अन् शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढला

सकाळ वृत्तसेवा

येसगाव (जि. नाशिक) : जिल्ह्यात पसरलेल्या थंडीचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. कडाक्याच्या थंडीसोबत पहाटेपासून दाट धुके पडत असल्यामुळे धुके निवळेपर्यंत जनजीवन विस्कळित होत आहे. (Due to fog highway traffic affected and farmers cost of spraying medicine increased in winter Nashik News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

येसगाव : शेतातील गव्हाच्या पिकावर पडलेले धुके.

धुक्यामुळे समोरचे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे महामार्ग व ग्रामीण भागातील रस्त्यांवर धुक्याच्या वेळेस वाहतूक मंदावलेली असते. गेल्या दोन दिवसांपासून धुक्याचे प्रमाण वाढलेले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून दुपारपर्यंत किंवा दिवसभर सूर्यदर्शन धुके व ढगाळ वातावरणामुळे होत नाही.

धुके पडल्यामुळे शेतीकडे जाणारे पांदी रस्ते तर धुक्यात हरवले असल्याचा भास होतो. शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्याचा परिणाम रब्बीवर होऊ लागला आहे. बऱ्याच भागात गव्हावर तांबेरा, बुरशीजन्य रोग, उन्हाळ कांद्याची पात पिवळी पडण्यास सुरवात होत आहे.

बऱ्याच ठिकाणी तुरीच्या शेंगांवर व हरभराच्या घाट्यांवर आळी व रोग किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. काही भागात औषध फवारणी सुरू आहे. अशा वेळेस तुषार सिंचन किंवा रेन वॉटर पाइप पाण्याचा उपयोग होतो, असे अनुभवी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tatya Tope Letter: तात्या टोपेंची सही असलेलं 1857 चं पत्र सापडलं; ऐतिहासिक क्रांतीचं गुपित झालं उघड

९० वर्षीय महिलेला दिलासा, २० वर्षे सुनावणी घेऊ नये म्हणणाऱ्या हायकोर्टानं बदलला आदेश, दिली पुढची तारीख

Latest Marathi News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा मेडिगट्टा लक्ष्मी धरण 70% कोरडं

IPL 2026: ऑरेंज असो वा पर्पल कॅप, SRH चेच खेळाड़ू आहेत सध्या ऑन टॉप; पाहा सर्वाधिक धावा अन् विकेट्स घेणारे ५ खेळाडूंची लिस्ट

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT