Shop full of fish. esakal
नाशिक

Nashik News : थंडी वाढल्याने मासळीच्या दरात उसळी; खवय्यांना मोजावे लागताहेत अधिकचे पैसे

समुद्री मासळीमध्ये पापलेट, पिवळी वाम, काळी वाम, सुरमई आणि कोळंबी याला अधिक पसंती दिली जाते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. मागणी वाढल्याने मासळीच्या दरात प्रतिकिलो ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. मासांहारवर ताव मारणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

थर्टीफर्स्टपासून कुठे ना कुठे लहान-मोठ्या पार्ट्या होत आहेत. (due to increased demand of fish Non vegetarians pay more nashik news)

पार्ट्यांसाठी मासळी,मटण आणि चिकनची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे, असे मासळी विक्रेता सोमनाथ कोळी यांनी सांगितले. समुद्री मासळीमध्ये पापलेट, पिवळी वाम, काळी वाम, सुरमई आणि कोळंबी याला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे त्यांच्या घाऊक दरात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे.

घाऊक बाजारात सुरमई प्रतिकिलो ५०० रुपये होती. ती आता ७०० ते ८०० रुपयांवर पोचली आहे. पापलेटही महागले आहेत. कोळंबी ४०० रुपयांवरून ६०० ते ६५० रुपयांवर उपलब्ध आहे. नवीन वर्ष स्वागत व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर झालेली दरवाढ मात्र कायम आहे. एकंदरितच मांसाहार खवय्यांप्रेमींना मांसाहारावर व मासळीवर ताव मारण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

असे आहेत मासळीचे दर (प्रतिकिलो)

पापलेट : १२०० रुपये

पिवळी वाम : ११०० ते १२०० रुपये

काळी वाम : ६०० ते ८०० रुपये

सुरमई : ७०० ते ८०० रुपये

कोळंबी : ६०० ते ८०० रुपये

राणी मासा : ६०० ते ७०० रुपये

कटला : ३०० ते ३५० रुपये

रावस : ३०० ते ३५० रुपये

कोंबडा : २५० ते ३०० रुपये

झिंगा : ८०० ते ९०० रुपये

ओले बोंबील : २५० ते ३०० रुपये

बांगडा : २५० ते ३५०

नदीतील मुरी : ८०० रुपये

खेकडा : ४०० ते ६००रुपये

बोकडाचे मटण : ६४० ते ७०० रुपये

चिकन (बॉयलर ) : २४० ते २८० रुपये

चिकन ( गावठी ) : ४५० ते ६०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT