Nashik Battry Induction
Nashik Battry Induction  esakal
नाशिक

Nashik News : महागाईमुळे स्वयंपाक होऊ लागला बॅटरीवरील शेगडीवर

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : इंधन दरवाढीने गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती दुप्पटीने वाढल्यात. महागाईने सर्व सामान्य नागरिक हतबल झालेत. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीचा भडका उडाला आहे. गॅस सिलेंडर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर पोचलयं. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातील बॅटरीवरील शेगडीवर स्वयंपाक होऊ लागला आहे. धुर ओकणाऱ्या पारंपारिक चुलीची जागा या शेगडीने घेतली आहे. हॉटेल व्यावसायिक सुद्धा तिचा वापर करु लागलेत.

आघार बुद्रूकच्या शेगडीला महाराष्ट्राप्रमाणे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, राज्यस्थानमधून मागणी वाढली आहे. सुरवातीला या शेगडीची किंमत तेराशे रुपये होती. शेगडी लोखंडापासून तयार होते. लोखंड, मटेरियल व इलेक्ट्रॉनिक साहित्य दरवाढ झाल्याने शेगडीचे दर वाढले आहेत. महिन्याकाठी इथे चारशे शेगड्या विकल्या जात आहेत. गरजेवर एकीकडे हा उपाय शोधला असताना दुसरीकडे बॅटरीवरील शेगडी हे स्टार्टअप झाले आहे.(Due to inflation, cooking started on battery Induction Replaced traditional stove Also used in hotel business Nashik News)

ग्रामीण भागातील अनेक कुटुंब गॅस सिलेंडर सोडून चुलीकडे वळाले आहेत. चुलीवर धूर मोठ्या प्रमाणात होत असल्याने बॅटरीवरील शेगडीचा वापर सुरु झाला आहे. आघार बुद्रुक (ता. मालेगाव) येथील योगेश खरे या तरुणाने बॅटरीवर चालणाऱ्या शेगडीची निर्मिती केली आहे. खरेंचे शिक्षण बारावीपर्यत झाले.

त्यांनी २००३ ला त्यांच्या वडिलांच्या मदतीने सिमेंटची शेगडी तयार केली. सिमेंटच्या शेगडीपासून त्यांनी २००७ मध्ये बॅटरीवर चालणारी लोखंडी शेगडी (चूल) तयार केली. सुरवातीला ही शेगडी वापरणाऱ्यांची संख्या मर्यादित होती. पण घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या वाढत गेल्याने या शेगडीचा वापर वाढत चालला आहे.

शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये चुलीवरच्या जेवणाची ‘क्रेझ' आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी बॅटरीवरील शेगडीच्या वापराला सुरवात केली. शेगडी गरीब कुटुंबाचा आधार बनली आहे. शेगडीला ग्रामीण भागात ‘निर्धूर चूल' म्हणतात. शेगडीतून धूर निघत नसल्याने ही ओळख तयार झाली.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

‘चार्जिंग'चा खर्च

शेगडी अल्प खर्चात चालते. तिला खर्च ‘चार्जिंग'चा. घरगुती वापरासाठी चार्जिंग केल्यानंतर चोवीस तास, तर व्यवसायिकासाठी बारा तास ही शेगडी चालते. शेगडीत जळाऊ लाकूड व दगडी कोळसा व शेतातील मक्याचे निघालेले कणसे याच्यावर जेवण तयार होते. कुटुंबाचा दोन वेळचा स्वयंपाक होतो. शेगडीवर जेवणाची चवही चुली सारखी आहे.

शेगडीचे दर

० २००३ मध्ये-२७५ रुपये (सिमेंट शेगडी)

० २००९ मध्ये- तेराशे रुपये (सुरवातीला)

० २०१९ मध्ये-अठराशे रुपये

० आताचे- दोन हजार दोनशे रुपये

परोपकारी वृक्ष

छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे।

फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव ।।

हा संस्कृत सुविचार आहे. अर्थात, वृक्ष इतरांसाठी सावली देत स्वतः उन्हात उभे राहतात. फळे सुद्धा इतरांसाठी असतात. त्यामुळे वृक्ष सज्जनांसमान आहे. म्हणजेच, सज्जन इतरांसाठी कष्ट सहन करतात. त्याप्रमाणे वृक्ष हे परोपकारी असतात.

"एक शेगडी तयार करण्यासाठी तीन तास लागतात. दिवसाला तीन ते चार शेगडी तयार होतात. एक शेगडी ही दोन हजार रुपयात विक्री होते. सहा महिने त्याच्या बॅटरीची गॅरंटी असते. ही शेगडी चार ते पाच वर्षे सहज टिकते."

- योगेश खरे (बॅटरीवरील शेगडी निर्माता)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

SCROLL FOR NEXT