Farmer
Farmer Sakal
नाशिक

मालेगाव तालुक्यात पेरण्या खोळंबल्या, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

प्रमोद सावंत

सोयगाव (जि. नाशिक) : मालेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मृग नक्षत्राचा कालावधी संपूनही या नक्षत्रात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या पेरणीची कामे खोळंबली आहेत.

मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात १ जूनला झालेल्या निसर्ग वादळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली.त्यामुळे शेतकऱ्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग या पिकांची पेरणी पूर्ण केली होती. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजी वाढली आहे. शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिलमध्ये शेताची नांगरणी करून ठेवली आहे. काही शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर ढेकळे सपाट करण्याचे काम केले. यंदा पुरेसा पाऊस नसल्याने ढेकळे फुटत नाहीत त्यामुळे जमीन सपाट झाली नाही.


सध्या तालुक्यात पाऊस नसल्याने शेती मशागतीची कामे रखडली आहेत. अद्यापही पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने यावर्षीच्या खरीप हंगामास उशिर होत आहे. ३० जूनपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मका, सोयाबीन या पिकांच्या पेरण्यांना फाटा देऊन बाजरीची पीक घ्यावे लागेल. बाजरी पीक बाराशे ते तेराशे रुपये क्विंटल भावाने विक्री होते. मका व सोयाबीन हे नगदी पीक शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देतात. त्यामुळे शेतकरी दररोज पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस वेळेवर होत नसल्याने पेरणी खोळंबली आहे.

(Due to lack of rains sowing has been stopped in Malegaon taluka)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT