Godavari ghat
Godavari ghat Sakal
नाशिक

नाशिक : गोदावरी घाटालगतच्या झोपडपट्ट्या हलविल्या; रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. पंचवटी- रामघाट गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या झोपड्या मनपा पंचवटी विभाग आपत्ती व्यवस्थापन व निवारण कक्षाकडून शुक्रवारी (ता. ३०) हटविण्यात आले. येथील रहिवाशांना मनपा व संत गाडगेबाबा धर्मशाळेत स्थलांतरित करण्यात आले. तसेच, नदीकाठच्या सर्व रहिवासी व व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Due to rising level of Gangapur dam slums on Godavari ghat have been shifted)



सद्यस्थितीत गंगापूर धरण परिक्षेत्रात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणात पाण्याची पातळी वाढली असून, सध्या ८५ टक्के भरले आहे. सार्वजनिक पाटबंधारे विभागाकडून गंगापूर धरणाच्या बचावासाठी गुरुवारी (ता. २९ ) ३५०० क्यूसेक गोदावरीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जुलैच्या अखेरीस नाशिकच्या गोदावरी नदीला पहिलाच पूर आला आहे. धरणाच्या पातळीत वाढ होऊन गोदावरी नदीला मोठ्या पुराची शक्यता आहे. याची दक्षता म्हणून जिल्हा प्रशासन आणि नाशिक मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून गोदावरी नदीच्या काठावरील रहिवासी नागरिक व व्यवसायदारांना सतर्कतेचा इशारा व आवश्यक सूचना देण्यात आल्या. दरम्यान, मनपा, पंचवटी पोलिस आणि जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून पंचवटी- रामकुंड व गोदाघाट परिसरात सर्वत्र ध्वनीप्रक्षेपकाद्वारे सावधानतेचा इशारा देण्यात आल्या आहे.

सध्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले असल्यामुळे पुराचा धोका लक्षात घेऊन मनपा पंचवटी विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत आज गोदावरी नदीच्या काठावरील गौरी पटांगणातील व परिसरातील रहिवासी झोपड्या हटविण्यात आले. येथील बेघर रहिवाशांना पंचवटीतील संत गाडगेबाबा धर्मशाळा आणि मनपाच्या निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले. त्यांना आवश्यक सूचना देण्यात आले. यासाठी पंचवटी विभागीय अधिकारी प्रकाश निकम, पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, बांधकाम विभागाचे शाखा उपअभियंता प्रदीप भामरे, समीर रकटे, शंकर ठेवणे, सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख, राजेश सोनवणे, स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, अग्निशमन दलाचे संजय कानडे, अतिक्रमण विभागाचे रतन गायधनी, प्रकाश उखाडे, दीपक मिंदे, भरत बर्वे, सुनील थळकर, राहुल बोटे, सचिन गवळी, किशोर साळवे, अनिल नेटावणे, संजय बोरसे आदी सहभागी होते.

सध्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले असल्यामुळे पुराचा धोका लक्षात घेऊन मनपा पंचवटी विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत आज गोदावरी नदीच्या काठावरील गौरी पटांगणातील व परिसरातील रहिवासी झोपड्या हटविण्यात आले. येथील बेघर रहिवाशांना पंचवटीतील संत गाडगेबाबा धर्मशाळा आणि मनपाच्या निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले. त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यासाठी पंचवटी विभागीय अधिकारी प्रकाश निकम, पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, बांधकाम विभागाचे शाखा उपअभियंता प्रदीप भामरे, समीर रकटे, शंकर ठेवणे, सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख, राजेश सोनवणे, स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, अग्निशमन दलाचे संजय कानडे, अतिक्रमण विभागाचे रतन गायधनी, प्रकाश उखाडे, दीपक मिंदे, भरत बर्वे, सुनील थळकर, राहुल बोटे, सचिन गवळी, किशोर साळवे, अनिल नेटावणे, संजय बोरसे आदी सहभागी होते.

(Due to rising level of Gangapur dam slums on Godavari ghat have been shifted)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT