MSBCC Survey esakal
नाशिक

Maratha Survey: ॲपमधील तांत्रिक अडचणीमुळे घर छाननीत अडथळे! सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राहिलेल्या घरांच्या छाननीचा निर्णय

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाजासह खुल्या वर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरातील मराठा समाजाचे मागासलेपण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सोपविल्यानंतर घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत तीन लाख घरांची छाननी करण्यात आली.

परंतु ॲप वापरताना निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींसह विविध समस्या निर्माण होत असल्याने त्यातून काही घरे सुटत आहे. त्यामुळे जानेवारीअखेर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राहिलेल्या घरांची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Due to technical problems in app obstacles in home inspection Decision on re examination of remaining houses after completion of maratha survey Nashik)

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाजासह खुल्या वर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाचे काम सुरू आहे.

सामाजिक मागासलेपण निकष सिद्ध करण्यासाठी सात निकष देण्यात आले आहे. त्यासाठी शंभर गुण दिले जाणार आहे. शैक्षणिक निकषांमध्ये सहा मुद्द्यांचा समावेश आहे. त्यासाठी ८० गुण दिले जाणार आहे.

आर्थिक निकषांसाठी सहा मुद्द्यांवर ७० गुण आहे. असे एकूण २५० गुण देण्यात आले असून, या निकषांच्या आधारावरच राज्यात सर्वेक्षण केले जात आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष शुक्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याच्या तयारीचा आढावा घेतला.

महापालिका हद्दीतील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत निश्चित करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने सर्वेक्षणासाठी महापालिकेचे जवळपास २६०० कर्मचारी शहरात घरांना भेटी देवून ॲपच्या माध्यमातून अर्ज भरून घेत आहे.

मनुष्यबळाची कमतरता

महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे. सध्या जे कर्मचारी काम करतात, त्यांच्यावर दोन ते तीन टेबलचा अतिरिक्त भार आहे.

महापालिका हद्दीतील जवळपास पाच लाख १३ हजार मिळकती असून, या प्रत्येक घरात जाऊन त्यांचे मागासपण तपासण्याच्या सूचना दिल्या.

शंभरहून अधिक अधिकारी वर्ग व २६०० कर्मचारी सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करून पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे.

साडेतीन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण

पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणाची माहिती संकलित करण्यासाठी शासनामार्फत तयार करण्यात आलेल्या ॲप्लिकेशन मध्ये ती भरली जाते. परंतु नेटवर्क व अन्य तांत्रिक समस्यांमुळे फॉर्म भरला जात नाही.

ती समस्या सोडविल्यानंतर आता कामकाज सुरळीत झाले. आतापर्यंत तीन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. तरी सुद्धा एकाच भागात एक-दोन घरे सुटल्याच्या तक्रारी आल्यानंतर ३१ जानेवारीनंतर पुन्हा राहिलेल्या घरांची छाननी केली जाणार असल्याची माहिती लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.

विभागनिहाय कुटुंब सर्वेक्षणाची आकडेवारी

विभाग सर्वेक्षण झालेली कुटुंबे

सातपूर ५३,०२९

नाशिक पश्चिम ३३,५००

नाशिक पूर्व ६९,४४९

पंचवटी ७०,०००

नाशिक रोड ५०,४००

सिडको ७७,६००

----------------------------------

एकूण ३,५३,९७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vodafone Idea AGR dues : वोडाफोन-आयडियाला सरकारचा दिलासा, तरीही शेअर्स कोसळले!₹87,695 कोटींच्या AGR ला मुदतवाढ; नेमकं काय घडलं?

Zomato Swiggy Latest News : ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला

Dilip Walse Patil : 'अवसरी खुर्द शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ११० कोटींचे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारणार' – माजी गृहमंत्री वळसे पाटील!

Nanded News : नववर्ष २०२६ स्वागतासाठी शिस्त आणि सुरक्षिततेचे आवाहन; सिंदखेड पोलीस सक्रिय!

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी वळणाचे वर्ष! निवडणूक रणशिंग, राजकीय समीकरणांची उलथापालथ आणि विकासकामांचा वेग

SCROLL FOR NEXT