LPG cylinder
LPG cylinder esakal
नाशिक

घरघुती LPG सिलिंडरचा व्यवसायिक वापर थांबवा

कुणाल संत

नाशिक : घरगुती सिलिंडरचा वाहनांमध्ये आणि व्यावसायिक वापरातून शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत आहे. तर यातून भविष्यात मोठा स्फोट होण्याचीदेखील शक्यता असल्याने हे तत्काळ थांबविले जावे, यासाठी ग्राहक भारतीतर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ‘घरगुती एलपीजी सिलिंडरमधून वाहन आणि व्यावसायिक उपयोगासाठी पलटी उद्योग : एक धोक्याची घंटा’ हे जनजागृती अभियानातून राबविण्यात आले. हे थांबविण्यासाठी धान्य वाटपासाठी जशी बायोमेट्रीक प्रणाली वापरली जाते, तशीच प्रणाली येथेही लागू करण्याची मागणीही शासनाला करण्यात येणार आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरचा सर्रास व्यावसायिक वापरासाठी वापर केला जात असल्याने ग्राहक भारतीकडून आयोजित पत्रकार परिषदेत या जनजागृती अभियानाबद्दल माहिती देण्यात आली. या वेळी कौंसिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट्स- ग्राहक भारती ’ या स्वयंसेवी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद तिवारी, उपाध्यक्ष नितीन सोळंके, शुभम रंगारी आदी उपस्थित होते.

व्यावसायिक सिलिंडरची किंमत वाढल्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठानांनी घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर सुरू केला आहे. वाहनांमध्येही याच सिलिंडरचा वापर होऊ लागल्याने शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. तसेच निष्काळजीपणे हाताळल्याने स्फोट आणि आगीचा मोठा धोका उत्पन्न झाला आहे. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

सरकारी ऑइल कंपन्या आणि एलपीजी वितरक यांनी संघटित रॅकेट चालविणाऱ्या समाजकंटकांना पाठीशी घातले आहे. शासनाने याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचेही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. घरगुती वापराच्या १४. २ किलोच्या एलपीजी सिलिंडरवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो, तर व्यावसायिक सिलिंडरवर १८ टक्के जीएसटी आकारला जातो.

घरगुती सिलिंडर व्यावसायिक, औद्योगिक वापरासाठी घेतले तर १३ टक्के जीएसटीची थेट चोरी होते. अशाप्रकारे जीएसटीची चोरी करून सरकारी महसुलाला कोट्यवधीचा चुना लावण्याचा प्रकार सुरू आहे. संपूर्ण देशात अर्थ व्यवस्थेवर याचा प्रतिवर्ष ४०,००० कोटी रुपयांचा प्रचंड परिणाम होत असून, तो तातडीने थांबविण्याची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT