Nashik
Nashik Sakal
नाशिक

VIDEO : नाशिकचे जिल्हा रुग्णालय हादरले! मोठ्या आवाजाने खळबळ

अरुण मलानी

रविवारी (ता.२३) रात्री साडे नऊच्‍या सुमारास जिल्हा रुग्णालयात मोठा आवाज झाला. आणि अवघे रुग्णालय हादरले. यावेळी जिल्‍हा रुग्‍णालयात ऑक्‍सीजन गळती झाल्‍याची चर्चा या घटनेनंतर पसरली होती.


नाशिक : रविवारी (ता.२३) रात्री साडे नऊच्‍या सुमारास जिल्हा रुग्णालयात मोठा आवाज झाला. आणि अवघे रुग्णालय हादरले. यावेळी जिल्‍हा रुग्‍णालयात ऑक्‍सीजन गळती झाल्‍याची चर्चा या घटनेनंतर पसरली होती. दरम्‍यान अचानक झालेल्‍या मोठ्या आवाजामुळे जिल्‍हा रुग्‍णालय आवारात काही मिनीटांसाठी खळबळ उडाली होती. (Due to the loud noise of the suction machine panic at the district hospital in nashik)

जिल्‍हा रुग्‍णालयात ऑक्‍सीजन गळती झाल्‍याची चर्चा या घटनेनंतर पसरली होती. मात्र अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. के. आर. श्रीवास यांनी यासंदर्भात माहिती देतांना ऑक्‍सिजनचा या घटनेशी संबंध नसल्‍याचे नमूद केले आहे. ते म्‍हणाले, की जिल्‍हा रुग्‍णालयात तीन सक्‍शन युनीटपैकी एका युनीटमध्ये बिघाड झाल्‍याने मोठा आवाज झाला. त्‍यामुळे ड्युटीवर कर्मचार्यांनी माहिती दिल्‍यानंतर अग्‍निशमन दल, तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. या सक्‍शन युनीटचा आणि ऑक्‍सिजन पुरवठा करणार्या पाईपचा कुठलाही संबंध नाही. ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीतपणे सुरु असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. सक्‍शन पाईप व ऑक्‍सिजन या दोन्‍ही बाबी वेगळ्या असल्याचे त्‍यांनी नमूद केले. दरम्‍यान अचानक झालेल्‍या मोठ्या आवाजामुळे काही मिनीटांसाठी रुग्‍णालयातील रुग्‍ण व आवारात असलेल्‍या त्‍यांच्‍या नातेवाईकांची धावपळ उडाली होती.

या सक्शन युनिटचा आणि ऑक्सिजनचा काही एक संबंध नसुन ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना कुठल्याही प्रकारची इजा नाही. तसेच सक्शन युनिट आणि ऑक्सिजन हे दोघे वेगळी बाब असल्याने कोणताही गैरसमज करू नये.

डॉ.के.आर. श्रीवास,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकजिल्हा रुग्णालय, नाशिक.

(Due to the loud noise of the suction machine panic at the district hospital in nashik)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT