A stunning replica of Adimaya created through laser esakal
नाशिक

Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगगडावर भाविकांचा महापूर; अष्टमीनिमित्त होम, पालखी मिरवणूक

दिगंबर पाटोळे

Saptashrungi Devi Gad : उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या सप्तश्रृंगीच्या शारदीय नवरात्रोत्सवात गडावर भाविकांचा ओघ अहोरात्र सुरू आहे. देवीच्या पादुकांची रविवारी (ता. २२) पालखी काढून दुर्गाष्टमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

दरम्यान, सोमवारी (ता. २३) महानवमीनिमित्त शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार मध्यरात्री गडाच्या शिखरावर दरेगावचे गवळी-पाटील कीर्तिध्वज फडकावतील. दरम्यान, आदिमायेच्या शिखरावरील डोंगरावर लेझरच्या माध्यमातून सुरेख देखावे साकारण्यात येत असून, ते लक्षवेधी ठरत आहेत. (Durga Ashtami is celebrated with enthusiasm on saptashrungi devi gad nashik news)

दुर्गाष्टमीनिमित्त भाविकांची रविवारी पहाटेपासूनच गर्दी झाली होती. सकाळी सातपासूनच मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या. त्यानंतर दुपारी गर्दीचा उच्चांक होत पहिल्या पायरीपर्यंत दर्शनासाठी बाऱ्या होत्या. पहिली पायरी ते मंदिरादरम्यान १६ ठिकाणी बाऱ्या लावून टप्प्याटप्प्याने भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते.

रविवारची पंचामृत महापूजा व आरती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे यांनी सहकुटुंब केली. दुपारी चारला न्यासाच्या कार्यालयात देवीच्या पादुकांचे विधीवत पूजन करून पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखी काढण्यात आली. हजारो भाविकांनी पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. ‘आई भगवती की जय’ आणि ‘सप्तशृंगी माते की जय’चा जयघोष केल्याने अवघा वणी गड दुमदुमून गेला होता.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. न्यासाच्या महाप्रसादालयात २० हजारांवर भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान, सोमवारी गडाच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकेल.

ध्वजाचे मानकरी असलेले दरेगाव (वणी)चे एकनाथ गवळी-पाटील व कुटुंबीयांनी आणि न्यासाने कीर्तिध्वजाच्या पूजाविधीची तयारी पूर्ण केली आहे. दुपारी साडेतीनला न्यासाच्या कार्यालयात कीर्तिध्वजाचे विधीवत पूजन होऊन ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल. तसेच, सायंकाळी पाचला देवी मंदिरात शतचंडी याग व होमहवनास प्रारंभ होईल आणि मंगळवारी (ता. २४) रात्री बाराला कीर्तिध्वज गडावर फडकणार आहे.

गडावर लेझरद्वारे रोषणाई

सप्तशृंगगडावर सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू असतानाच आकर्षक रोषणाईने गड उजळून निघाला आहे. त्याचबरोबर श्री सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्टतर्फे गडावर विशेष लेझर रोषणाई करण्यात आली. या रोषणाईच्या माध्यमातून विशालकाय सप्तशृंगमातेच्या मंदिरावरील डोंगरावर आदिमायेची छबी तसेच आई सप्तशृंग हे नाव साकारण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य भाविकांच्या उत्साहात आणखीच भर घालत आहे. नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमेला ही रोषणाई सुरू असेल. या लेझर रोषणाईमुळे रात्री गडाचे सौंदर्य खुलत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT