नाशिक

टुडे पान २ साठी.. अवतीभवती

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. अवतीभवती -- धुळ्यात धनदाई नगरात रावणदहन सोहळा धुळे : दसऱ्याच्या मुहूर्तावर देवपूरमधील धनदाई नगर येथील मोकळ्या मैदानात धनदाई नगर सांस्कृतिक व अध्यात्मिक मित्रमंडळातर्फे प्रभू श्रीरामांच्या जयघोषात रावणदहन सोहळा उत्साहात पार पडला. स्पंदन पाटील याने श्रीराम, प्रणय सोनवणे याने लक्ष्मण आणि श्रेयस वाणी यांनी हनुमान भूमिका साकारलेल्या प्रतीकात्मक वेशभूषा विशेष आकर्षण ठरल्या. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात आणि युवकांच्या सहभागातून पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक एकोपा व बंधुभाव जपण्याचा संदेश दिला. भाजपचे पदाधिकारी रणजितराजे भोसले, प्राचार्य डॉ. प्रविणसिंग गिरासे, भैयासाहेब पाटील, सोमनाथ अहिरे, शांताराम अहिरे, संभाजी देसले, बापू बोरसे, गोरख पाटील, राजेंद्र पाटील, डॉ. सुरेंद्रसिंग राजपूत, भटू भावसार, राजेंद्र बिलारीस, सतीश शिंपी उपस्थित होते. रवींद्र अहिरराव, निखिल चौधरी, नितीन अहिरे, हंसराज महाजन, गुणवंत मोरे, डॉ. संदीप पाटील, दीपक महाले, स्वप्नील पाटील, प्रा. महेश बिलारीस, प्रा. महेश पाटील, प्रा. डॉ. इंद्रजित गिरासे, सुमित भावसार, उमेश भदाने, शुभम ठाकरे, योगेश ठाकूर, सचिन वाघ, दत्तू माळी आणि शशिकांत महाजन यांनी संयोजन केले. -- निकम इन्स्टिट्यूटमध्ये वाचनप्रेरणा दिन साजरा धुळे : येथील निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला. माहितीशास्त्र विभागाचे मार्गदर्शक डॉ. प्रवीण बोरसे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष रोहित रवींद्र निकम यांनी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनातून ज्ञानात सतत भर घालण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, सचिव प्रा. शुभांगी निकम, सदस्य डॉ. आदित्य निकम, प्राचार्य प्रा. डॉ. सुनील देसले, प्रा. डॉ. रवीकुमार पाटील, प्रा. अनंत वाघ, प्रा. नितीश बडगुजर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुड न्यूज? आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! थकबाकीबाबतही उत्सुकता

Diwali Furniture Polishing Tips: दिवाळीच्याआधी लाकडी फर्निचर चमकवायचंय? घरातल्याच 'या' वस्तू येतील उपयोगी

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

MBBSच्या विद्यार्थ्यांना दिलासा! अतिरिक्त परीक्षेची संधी; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय

SANJU SAMSON RECORD: जगात भारी संजू सॅमसनचा विक्रम! जोस बटलरला मागे टाकत २००+ स्ट्राइक रेटने नवा विक्रम;T20 क्रिकेटमध्ये बनला नंबर वन!

SCROLL FOR NEXT